पॉचेफस्ट्रूम, 04 फेब्रुवारी : कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्यात अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कपची सेमीफायनल रंगणार आहे. अंडर-19 वर्ल्ड कप 2020चा हा पहिला सेमीफायनल सामना भारत-पाक यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्याकडे साऱ्या जगाचे लक्ष आहे.
भारताने प्रियम गर्गच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला 74 धावांनी पराभूत करून अंडर 19 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली. तर पाकिस्तानने अफगाणिस्तानला पराभूत करून अंतिम चार जणांमध्ये स्थान पटकावलं आहे. अंडर 19 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिली लढत होणार आहे.
वाचा-भारत-पाक महामुकाबला! वर्ल्ड कपमधील पहिली सेमीफायनल आज रंगणार
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 23 सामने झाले आहेत. यातील 14 भारताने तर 8 पाकिस्तानने जिंकले आहेत. एक सामना टाय झाला होता. सध्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा यशस्वी जयस्वाल फॉर्ममध्ये आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. तर गोलंदाजांमध्ये रवि बिश्नोई चौथ्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड कपमध्ये भारत पाक 9 वेळा आमने सामने आले आहेत. यात 4 वेळा पाकिस्तान तर 5 वेळा भारताने विजय मिळवला आहे. गेल्या तीन सामन्यात भारताने पाकिस्तानला लोळवलं आहे. पाकिस्तानच्या संघाने 23 जानेवारी 2010 मध्ये भारताला वर्ल्ड कपमध्ये पराभूत केलं होतं.
वाचा-बेx xx! विराट नेहमी काय बोलतो? बेन स्टोक्सचं हे भन्नाट उत्तर पाहाच
येथे पाहा सामना LIVE
आज दुपारी 1.30 वाजता सामना सुरू होणार आहे. तर दुपारी 1 वाजता सामन्याचा टॉस होईल. हा सामना दक्षिण आफ्रिकेच्या पॉचेफस्ट्रूम येथील सॅनवेस पार्क मैदानावर खेळला जाईल. हा सामना स्टार स्पोर्ट्स 3 चॅनलवर लाईव्ह पाहू शकता.
वाचा-टीम इंडियाला दंड! न्यूझीलंडविरुद्ध मालिका जिंकली पण मिळणार नाहीत पूर्ण पैसे
भारतीय U19 टीम: यशस्वी जयस्वाल, दिव्यांश सक्सेना, तिलक वर्मा, प्रियम गर्ग, ध्रुव जुरेल, सिद्धेश वीर, अथर्व अंकोलेकर, रवि बिश्नोई, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, आकाश सिंग, विद्याधर पाटील, शुभांग हेगडे, शाश्वत रावत, कुमार कुशाग्र
पाकिस्तान U19 टीम: हैदर अली, मोहम्मद हुरारा, रोहेल नजीर, फहद मुनीर, कासिम अकरम, मोहम्मद हैरिसव, इरफान खान, अब्बास अफरिदी, ताहिर हुसैन, आमिर अली, मोहम्मद आमिर खान, मोहम्मद वासिम ज्यूनिअर, अब्दुल बांगलजई, मोहम्मद शहजाद, आसिफ अली खान
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.