Home /News /sport /

BREAKING : टीम इंडियाला मोठा धक्का, 6 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, कोच ड्रिंक्स घेऊन मैदानात

BREAKING : टीम इंडियाला मोठा धक्का, 6 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, कोच ड्रिंक्स घेऊन मैदानात

अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये (Under-19 World Cup) टीम इंडियाला मोठा धक्का लागला आहे. बुधवारी आयर्लंडविरुद्ध (India vs Ireland) टीम दुसरी मॅच खेळत आहे, पण मॅचआधीच कर्णधार यश ढूल (Yash Dhull) आणि उपकर्णधार एसके राशिद मैदानात उतरले नाहीत.

पुढे वाचा ...
    बारबाडोस, 19 जानेवारी : अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये (Under-19 World Cup) टीम इंडियाला मोठा धक्का लागला आहे. बुधवारी आयर्लंडविरुद्ध (India vs Ireland) टीम दुसरी मॅच खेळत आहे, पण मॅचआधीच कर्णधार यश ढूल (Yash Dhull) आणि उपकर्णधार एसके राशिद मैदानात उतरले नाहीत. कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे दोघंही आयसोलेट झाले आहेत. टीम इंडियाच्या वर्ल्ड कपच्या तयारीसाठी हा मोठा झटका आहे. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात निशांत सिद्धू टीमचं नेतृत्व करत आहे. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार टीमचे अर्धा डझन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, या कारणामुळे टीमच्या कोचना मैदानात ड्रिंक्स घेऊन जावं लागत आहे. यश ढूल आणि राशिदशिवाय मानव प्रकाश, सिद्धार्थ यादव, आराध्य यादव आणि वासू वत्स आयसोलेशनमध्ये आहेत. खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे टीमची स्थिती खराब आहे. मॅचसाठी प्लेयिंग इलेव्हनची निवड करणंही भारताला अडचणीचं ठरलं. आयसीसीने या स्पर्धेसाठी 17 खेळाडूंची निवड करायला परवानगी दिली होती, त्यामुळे टीम मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरू शकली. खेळाडू कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खेळाडू पॉझिटिव्ह खेळाडूंच्या संपर्कात आले, यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून त्यांना आयसोलेट करण्यात आलं. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. भारताने सर्वाधिक 4 वेळा अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Coronavirus, Team india

    पुढील बातम्या