Under 19 World Cup : VIDEO : अशी पोहचली टीम इंडिया फायनलमध्ये, 150 सेकंदात पाहा युवा ब्रिगेडचा विजयी प्रवास!

Under 19 World Cup : VIDEO : अशी पोहचली टीम इंडिया फायनलमध्ये, 150 सेकंदात पाहा युवा ब्रिगेडचा विजयी प्रवास!

भारत-बांगलादेश यांच्यात अंतिम लढत 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे. युवा ब्रिगेडकडे पाचव्यांदा चॅम्पियन बनण्याची संधी असणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 फेब्रुवारी : वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच सातव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केलेला संघविरुद्ध प्रथमच विजेतेपदासाठी लढणारा संघ असा सामना पाहायला मिळणार आहे. एक संघ तब्बल चार वेळा चॅम्पियन ठरला आहे तर दुसर्‍या संघाचे हे पहिले विजेतेपद आहे. हा फरक भारत आणि बांगलादेश या संघात असला तरी या दोन्ही संघांमध्ये साम्यही बरेच आहे.

दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणा 13व्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये (Under19 World Cup) भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांनी एकही सामना गमावलेला नाही. आता हेच दोन संघ रविवारी 9 फेब्रुवारी रोजी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे. भारत-बांगलादेश यांच्यात रविवारी अंतिम सामना होणार आहे. दोन्ही संघ विजेतेपदासाठी मैदानात उतरतील तेव्हा ही स्पर्धा रंजक ठरणार आहे. फायनलमध्ये जाण्यासाठी भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 10 विकेटनं विजय मिळवला. तर बांगलादेशने दुसर्‍या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा 6 विकेटनं पराभव केला. भारत-बांगलादेश यांच्यात वर्ल्ड कपमध्ये एकूण 4 सामने खेळले गेले आहेत. यात भारताला सर्वात जास्त म्हणजे तीनवेळा विजय मिळवला आहे तर बांगलादेशने एकदा भारताला पराभूत केले आहे.

वाचा-U19 World Cup: बांगलादेशची पहिल्यांदाच फायनलमध्ये धडक, भारताला देणार आव्हान

असा होता टीम इंडियाचा फायनलपर्यंतचा प्रवास

अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारतानं पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. हा सामना भारतानं 90 धावांनी जिंकला होता. तर, दुसऱ्या सामन्यात जपानविरुद्ध 10 विकटेनं दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंत न्यूझीलंडविरुद्ध 44 धावांनी आणि ऑस्ट्रेलियाला 74 धावांनी नमवत टीम इंडियाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर, उपांत्यफेरीत टीम इंडियाने आपला कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानवर 10 विकेटनं विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला. आता भारताची अखेरची लढत बांगलादेशविरुद्ध रविवारी 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

वाचा-सचिनचा मोठा खुलासा! ‘या’ ऑस्ट्रेलियन फलंदाजात दिसते स्वत:ची छबी

वाचा-राजस्थान रॉयल्स संघाला IPLआधीच मोठा धक्का, विदेशी खेळाडूने घेतली माघार!

आशिया कपमध्ये भारत-बांगलादेश आले होते आमने-सामने

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आशिया चषक फायनलमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात लढत झाली होती. भारताने प्रथम फलंदाजी करताना केवळ 105 धावा केल्या होत्या. यावेळी बांगलादेश एकहाती सामना जिंकेल असे वाटत होते, मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमाल कामगिरी करत अंतिम सामन्यात बांगलादेशला 101 धावांतच लोळवले. याचबरोबर बांगलादेशला नमवत आशिया चषक आपल्या नावावर केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Feb 7, 2020 02:41 PM IST

ताज्या बातम्या