मुंबई, 22 जानेवारी : दक्षिण आफ्रिका येथे सध्या अंडर 19 महिला टी 20 वर्ल्ड कप सुरु आहे. या वर्ल्ड कपमध्ये काल भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलिया संघाशी झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 7 विकेट्सने दारुण पराभव केला. सलग तीन विजयानंतर भारतीय संघाला सुपर-6 च्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून मोठा धक्का बसला.
अंडर 19 महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये सुपर 6 फेरीत मध्ये भारतीय संघाचा हा पहिलाच सामना होता. णेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना सुरु झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी एक एक करून भारताच्या सर्व फलंदाजांना माघारी धाडले. अंडर 19 महिला वर्ल्ड कपमध्ये धुवाधार बॅटिंग करणारी कर्णधार शेफाली वर्मा हिच्यावर केवळ 8 धावा करून माघारी फिरण्याची नामुष्की ओढवली.
सलामीवीर श्वेता सेहरावतने 21 तर हर्षिता बसू आणि तीतास साधूने 14-14 धावा केल्या. 8 फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय संघाचा संपूर्ण डाव 18.5 ओव्हरमध्ये 87 धावांत गुंडाळला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने केवळ 3 विकेट्स गमावून भारताने दिलेले आव्हान पूर्ण केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, India vs Australia, Indian women's team, T20 cricket