S M L

19 वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये भारतानं आॅस्ट्रेलियाचा केला 100 धावांनी पराभव

19 वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये पहिल्याच सामन्यात, भारतानं ऑस्ट्रेलियाचा 100 धावांनी पराभव केलाय. पहिल्यांदा बॅटिंग करतांना भारतानं 50 ओव्हरमध्ये 328 रन्स केले. पृथ्वी आणि मनजोतनं 180 धावांची सलामी दिली.

Sonali Deshpande | Updated On: Jan 14, 2018 02:25 PM IST

19 वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये भारतानं आॅस्ट्रेलियाचा केला 100 धावांनी पराभव

14 जानेवारी : 19 वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये पहिल्याच सामन्यात, भारतानं ऑस्ट्रेलियाचा 100 धावांनी पराभव केलाय. पहिल्यांदा बॅटिंग करतांना भारतानं 50 ओव्हरमध्ये 328 रन्स केले. पृथ्वी आणि मनजोतनं 180 धावांची सलामी दिली. पृथ्वीचं शतक अवघ्या 6 धावांनी हुकलं तर मनजोत कलरानं 86 धावांची खेळी केली.

तर शुभम गिलनं 63 धावा केल्या. 329 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाला पेललं नाही. 228 धावांमध्ये ऑस्ट्रेलियाची टीम गारद झाली. भारताकडून नगरकोटीनं 29 धावांमध्ये 3 विकेट्स घेतल्या. तर शिवम मावीनं 45 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाकडून जॅक एडवर्ड वगळता कुठलाही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. एडवर्डनी 71 धावांची खेळी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 14, 2018 02:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close