दुबई, 25 डिसेंबर : पाकिस्तानच्या अंडर-19 टीमने रोमांचक सामन्यामध्ये टीम इंडियाचा (India vs Pakistan) 2 विकेटने पराभव केला आहे. भारतीय टीम पहिले बॅटिंग करत (Under 19 Asia Cup) 237 रनवर ऑल आऊट झाली. या आव्हानाचा पाठलाग पाकिस्तानने अखेरच्या बॉलवर फोर मारून केला. पाकिस्तानने हे आव्हान 8 विकेट गमावून पार केलं. पाकिस्तानचा यंदाच्या आशिया कपमधला हा लागोपाठ दुसरा विजय आहे. भारताकडून विकेट कीपर बॅटर आराध्य यादव (Aaradhya Yadav) आणि राजवर्धन हंगर्गेकरने (Rajvardhan Hangargekar) चांगली कामगिरी केली, पण त्यांना टीमला जिंकवता आलं नाही.
आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. टीमने पहिल्याच ओव्हरमध्ये पहिली विकेट गमावली. मुहम्मद शहजाज आणि माज सदाकतने दुसऱ्या विकेटसाठी 64 रन केले. शहजाज 82 रन करून आणि सदाकत 29 रन करून आऊट झाले. पाकिस्तानची अवस्था 159/5 अशी झाली होती, पण नंतर इरफान खान आणि रिझवान महमूदने इनिंग सावरली.
पाकिस्तानला अखेरच्या 5 ओव्हरमध्ये विजयासाठी 39 रनची गरज होती आणि त्यांच्या 5 विकेट शिल्लक होत्या. इरफान खान 25 रन आणि रिझवान महमूद 28 रनवर खेळत होते. तेव्हा 46 व्या ओव्हरमध्ये फास्ट बॉलर राज बावाने 7 रन देऊन रिझवानची विकेट घेतली. यानंतर 47 व्या ओव्हरमध्येही 7 रनच आले, त्यामुळे अखेरच्या 3 ओव्हरमध्ये पाकिस्तानला 25 रनची गरज होती आणि 4 विकेट बाकी होत्या. 48 व्या ओव्हरमध्येही राज बावाने 7 रन देऊन इरफानची विकेट घेतली. बावाने 10 ओव्हरमध्ये 56 रन देऊन 4 विकेट मिळवल्या.
अखेरच्या दोन ओव्हरमध्ये पाकिस्तानला 18 रनची गरज होती आणि 3 विकेट शिल्लक होत्या. 49 व्या ओव्हरमध्ये राजवर्धनने 10 रन दिले. अहमद खानने एक फोर आणि एक सिक्स लगावली, त्यामुळे पाकिस्तानला अखेरच्या ओव्हरमध्ये 8 रनची गरज होती. फास्ट बॉलर रवी कुमार अखेरची ओव्हर टाकण्यासाठी आला. पहिल्याच बॉलला त्याने झिशानला शून्य रनवर आऊट केलं. दुसऱ्या बॉलवर अहमद खानने एक रन काढली. तिसऱ्या बॉलवर अलीनेही एक रन काढून अहमदला स्ट्राईक दिला. आता 3 बॉलवर 6 रनची गरज होती, तेव्हा अहमदने चौथ्या आणि पाचव्या बॉलवर प्रत्येकी 2-2 रन काढले. अखेरच्या बॉलवर 2 रनची गरज असताना अहमदने फोर मारली आणि पाकिस्तानला विजय मिळवून दिला. अहमदने 19 बॉलमध्ये नाबाद 29 रनची खेळी केली.
पाकिस्तानने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला होता. भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. अंगक्रिश रघुवंशी पहिल्याच ओव्हरमध्ये शून्य रनवर आऊट झाला. तिसऱ्या ओव्हरमध्ये फास्ट बॉलर झिशानने रशीदला 6 रनवर आणि कर्णधार यश धूलला शून्य रनवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. यानंतर निशांत सिद्धूही 8 रनवर माघारी परतला. भारताची अवस्था 41 रनवर 4 विकेट अशी झाली होती. पण ओपनर हरनूर सिंगने पाचव्या विकेटसाठी राज बावासोबत 55 रनची पार्टनरशीप केली. हरनूरने 6 फोरच्या मदतीने 46 रन केले. राजने 25 रनची खेळी केली.
IND vs PAK : 4,4,4,4,4,6, तुळजापूरच्या राजवर्धनने पाकिस्तानला धुतलं!
आराध्य यादव आणि कौशल तांबेने 7व्या विकेटसाठी 50 रन जोडले. आराध्यने 83 बॉलमध्ये 50 रनची खेळी करून भारताचा स्कोअर 200 रनच्या पार पोहोचवला. राजवर्धन हंगर्गेकरने (Rajvardhan Hangargekar) अखेरच्या विकेटसाठी रवी कुमारसोबत 33 रन जोडले. राजवर्धनने 20 बॉलमध्ये 5 फोर आणि एका सिक्सच्या मदतीने 33 रनची खेळी केली आणि भारताचा स्कोअर 230 च्या पुढे पोहोचवला. भारतीय टीम 49 ओव्हरमध्ये 237 रनवर आऊट झाली. पाकिस्तानचा फास्ट बॉलर झिशान झमीरने (Zeeshan Zameer) 60 रन देऊन 5 विकेट घेतल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs Pakistan, Team india