मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

2021 च्या शेवटीही भारत-पाकिस्तान महामुकाबला, फायनलही होणार रोमांचक!

2021 च्या शेवटीही भारत-पाकिस्तान महामुकाबला, फायनलही होणार रोमांचक!

यंदाच्या वर्षी 24 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यामध्ये टी-20 वर्ल्ड कपचा (T20 World Cup 2021) महामुकाबला पाहायला मिळाला. या सामन्यात टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला, पण आता वर्षाच्या शेवटी भारताला पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्धच्या या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 20 डिसेंबर : यंदाच्या वर्षी 24 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यामध्ये टी-20 वर्ल्ड कपचा (T20 World Cup 2021) महामुकाबला पाहायला मिळाला. या सामन्यात टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला, पण आता वर्षाच्या शेवटी भारताला पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्धच्या या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. अंडर-19 आशिया कपची (Under-19 Asia Cup) सुरुवात 23 डिसेंबरपासून होत आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानच्या टीम एकाच ग्रुपमध्ये आहेत. या दोन्ही टीममध्ये 25 डिसेंबर म्हणजेच ख्रिसमसच्या दिवशी दुबईमध्ये सामना होणार आहे. यंदाचा अंडर-19 आशिया कप युएईमध्ये होत आहे. यश ढूल टीम इंडियाचा कर्णधार आहे.

आशियाई क्रिकेट काऊन्सिलने आयोजित केलेल्या या स्पर्धेत 8 टीम खेळणार आहेत. या टीमना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. ग्रुप-एमध्ये भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि युएई आहेत, तर ग्रुप-बीमध्ये बांगलादेश, नेपाळ श्रीलंका आणि कुवेत आहेत. प्रत्येक टीम तीन-तीन मॅच खेळणार आहे, यानंतर दोन्ही ग्रुपच्या टॉप-2 टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील. भारत आणि पाकिस्तान दोन्ही सेमी फायनलमध्ये पोहोचल्या तर दोन्ही टीमची पुन्हा फायनलमध्येही लढत होऊ शकते.

अंडर-19 आशिया कपची सुरुवात 1989 साली झाली होती. आतापर्यंत या स्पर्धेचे 8 मोसम झाले आहेत, यात भारताने 7 वेळा स्पर्धा जिंकली तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला प्रत्येकी एक-एक वेळा विजय मिळवता आला. 2012 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेली फायनल टाय झाली, त्यामुळे दोन्ही टीमना संयुक्त विजेतेपद देण्यात आलं. 2013-14 साली झालेल्या फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा 40 रनने पराभव केला होता. स्पर्धेचा अखेरचा मोसम 2019 साली झाला होता. तेव्हा भारताने फायनलमध्ये बांगलादेशचा 5 रनने पराभव केला होता.

पुढच्या महिन्यात वेस्ट इंडिजमध्ये अंडर-19 वर्ल्ड कप होणार आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठीही आशिया कप महत्त्वाचा आहे.

आशिया कपमध्ये भारताच्या मॅच

23 डिसेंबर- भारत विरुद्ध युएई

25 डिसेंबर- भारत विरुद्ध पाकिस्तान

27 डिसेंबर- भारत विरुद्ध अफगाणिस्तान

30 डिसेंबर- सेमी फायनल

31 डिसेंबर- फायनल

भारतीय टीम

हरनूर सिंह पन्नू, अंगक्रिश रघुवंशी, अंश गोसाई, एसके रशीद, यश ढूल (कर्णधार), अनेश्वर गौतम, सिद्धार्थ यादव, कौशल तांबे, निशांत सिंधू, दिनेश बाना (विकेटकीपर), आराध्य यादव (विकेटकीपर), राजंगद बावा, राजवर्धन हैंगरगेकर, गर्व सांगवान, रवी कुमार, रिशिथ रेड्डी, मानव पारख, अमृत राज उपाध्याय, विक्की ओस्तवाल

First published: