मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Asia Cup: भारतीय अंडर-19 संघाने 8 व्यांदा आशिया कपचे विजेतेपद पटकावले; लंकेचा 9 गडी राखून पराभव

Asia Cup: भारतीय अंडर-19 संघाने 8 व्यांदा आशिया कपचे विजेतेपद पटकावले; लंकेचा 9 गडी राखून पराभव

Under-19 Asia Cup: डकवर्थ लुईस नियमानुसार भारतीय संघाला 102 धावांचे लक्ष्य मिळाले. भारताने हे लक्ष्य 21.3 षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. या सामन्यात डावखुरा फिरकी गोलंदाज विकी ओसवालने शानदार गोलंदाजी केली. त्याने 8 षटकात केवळ 11 धावा देत 3 बळी घेतले.

पुढे वाचा ...

दुबई, 31 डिसेंबर: भारतीय अंडर-19 (Under-19 Asia Cup) संघाने 8 व्यांदा आशिया कपचे विजेतेपद पटकावले आहे. शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार श्रीलंकेचा 9 गडी राखून पराभव केला. श्रीलंकेने प्रथम खेळताना 9 गड्यांच्या मोबदल्यात 106 धावा केल्या. मात्र, डकवर्थ लुईस नियमानुसार भारतीय संघाला 102 धावांचे लक्ष्य मिळाले. भारताने हे लक्ष्य 21.3 षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात आरामात पूर्ण केले. या सामन्यात डावखुरा फिरकी गोलंदाज विकी ओसवालने शानदार गोलंदाजी केली. त्याने 8 षटकात केवळ 11 धावा देत 3 बळी घेतले. ऑफस्पिनर कौशल तांबेनेही 2 बळी घेतले.

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, संघाची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने 47 धावांत 5 विकेट गमावल्या. जेव्हा श्रीलंकेची धावसंख्या 33 षटकांत 7 बाद 74 अशी होती. त्यानंतर पाऊस आला. यामुळे तासभर खेळ ठप्प झाला होता. त्यानंतर पुन्हा सामना सुरू झाला तेव्हा तो 38-38 षटकांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला. श्रीलंकेकडून 6 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. दहाव्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या यासिरो रॉड्रिगोने सर्वाधिक नाबाद 19 धावा केल्या.

हे वाचा - Womens Cricket vs Mens Cricket : महिला आणि पुरुष क्रिकेटमध्ये असतात हे 7 फरक, तुम्हाला माहिती आहेत का?

102 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचीही सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. संघाच्या 8 धावा फलकावर लागलेल्या असतानाच सलामीवीर हरनूर सिंग पायचित झाला. त्यानंतर मात्र श्रीलंकेला भारताचा एकही गडी बाद करता आला नाही. एक सलामीवीर झटपट तंबूत परतला तरी दुसऱ्या बाजूला अंगकृष्ण रघुवंशीने शानदार नाबाद अर्धशतकी खेळी केली. त्याने 67 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 56 धावा केल्या. शेख रशीदनेही 31 धावांची महत्वपूर्ण खेळी केली.

हे वाचा - Cricket Controversies : गांगुली-चॅपल ते धोनी सेहवाग, विराटआधी टीम इंडियामध्ये झालेले 5 वाद

फायनलमध्ये कधीच पराजय नाही

या स्पर्धेचा हा 9 वा हंगाम आहे. भारतीय अंडर-19 संघ आतापर्यंत आठव्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला. याआधीच्या 7 फायनल विषयी बोलायचे झाल्यास भारतीय संघाने 4 वेळा फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव केला आहे. म्हणजेच अंतिम फेरीत या संघाने श्रीलंकेचा आता 5 व्यांदा पराभव केला. भारताने एकदा पाकिस्तानला आणि एकदा बांगलादेशला हरवलंय. 2012 मध्ये सामना बरोबरीत सुटल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आलं होतं.

First published:
top videos

    Tags: Cricket, Cricket news