मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Asia Cup : भारत 8व्यांदा फायनलमध्ये, पण पाकिस्तानशी होणार नाही मुकाबला!

Asia Cup : भारत 8व्यांदा फायनलमध्ये, पण पाकिस्तानशी होणार नाही मुकाबला!

भारतीय अंडर-19 टीमने आशिया कपच्या (Under-19 Asia Cup) फायनलमध्ये धडक मारली आहे. भारताने सेमी फायनलमध्ये बांगलादेशचा (India vs Bangladesh) 103 रनने पराभव केला.

भारतीय अंडर-19 टीमने आशिया कपच्या (Under-19 Asia Cup) फायनलमध्ये धडक मारली आहे. भारताने सेमी फायनलमध्ये बांगलादेशचा (India vs Bangladesh) 103 रनने पराभव केला.

भारतीय अंडर-19 टीमने आशिया कपच्या (Under-19 Asia Cup) फायनलमध्ये धडक मारली आहे. भारताने सेमी फायनलमध्ये बांगलादेशचा (India vs Bangladesh) 103 रनने पराभव केला.

दुबई, 30 डिसेंबर : भारतीय अंडर-19 टीमने आशिया कपच्या (Under-19 Asia Cup) फायनलमध्ये धडक मारली आहे. भारताने सेमी फायनलमध्ये बांगलादेशचा (India vs Bangladesh) 103 रनने पराभव केला. पहिले बॅटिंग करत भारताने 243 रन केले, याचा पाठलाग करताना बांगलादेशचा फक्त 140 रनवर ऑल आऊट झाला. भारताचा फायनलमध्ये प्रवेश झाला असला तरी पाकिस्तानविरुद्ध सामना होणार नाही, कारण दुसऱ्या सेमी फायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानला (Pakistan Vs Sri Lanka) 22 रननी हरवलं आहे. आशिया कपची फायनल 31 डिसेंबरला होणार आहे. याआधी लीग स्टेजमध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. अंडर-19 आशिया कपचा हा 9 वा मोसम आहे, यातल्या 8 वेळा भारत फायनलमध्ये गेला, तर 7 वेळा स्पर्धा जिंकली.

भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला सुरुवातीपासूनच धक्के लागले. टीमने 59 रनवर 5 विकेट गमावल्या होत्या. अरिफुल इस्लामने 42 रन करून टीमची पडझड थांबवण्याचा प्रयत्न केला, पण पूर्ण टीम 38.2 ओव्हरमध्ये 140 रनवर ऑल आऊट झाली. भारताकडून विकी ओस्तवालने 10 ओव्हरमध्ये 25 रन देऊन 2 विकेट घेतल्या. तर राजवर्धन, रवी कुमार आणि राज बावा यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या.

या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला होता, यानंतर भारताची सुरुवातही खराब झाली. टीमने 62 रनवरच 3 विकेट गमावल्या होत्या. कर्णधार यश ढूलने 26 रन करून भारतीय इनिंग सावरली, पण टीमचा स्कोअर 7 विकेटवर 176 रन झाला. पण तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या शेख रशीदने 90 रनची खेळी करून भारताचा स्कोअर 240 पर्यंत नेला. शेख रशीदने 108 बॉलचा सामना केला. त्याच्या या खेळीमध्ये 3 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. विकी ओस्तवालने 18 बॉलमध्ये 28 रन केले. त्याने नवव्या विकेटसाठी राशिदसोबत नाबाद 50 रनची पार्टनरशीप केली. भारताने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 243 रन केले.

दुसऱ्या सेमी फायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानचा 22 रनने पराभव केला. श्रीलंकेच्या टीमने पहिले बॅटिंग करत फक्त 147 रन केल्या, त्यांनी पहिल्या 8 विकेट 70 रनवरच गमावल्या होत्या, यानंतर यासिरू रोड्रिगोने नाबाद 31 आणि पथिरानाने 31 रन करून टीमला 140 पर्यंत पोहोचवलं. यानंतर पाकिस्तानचा 125 रनवरच ऑल आऊट झाला.

First published:
top videos