मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Asia Cup : भारत-पाकिस्तान विजयासह सेमी फायनलमध्ये, फायनलला पुन्हा भिडणार!

Asia Cup : भारत-पाकिस्तान विजयासह सेमी फायनलमध्ये, फायनलला पुन्हा भिडणार!

भारताची अंडर-19 टीमने आशिया कपच्या Under-19 Asia Cup) सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. भारतीय टीमने लीग राऊंडच्या रोमांचक सामन्यात अफगाणिस्तानचा (India vs Afghanistan) 4 विकेटने पराभव केला. या विजयासोबतच भारत आणि पाकिस्तानच्या टीम सेमी फायनलला पोहोचल्या आहेत. आता या दोन्ही टीम पुन्हा एकदा फायनलमध्ये एकमेकांविरुद्ध (India vs Pakistan) खेळू शकतात.

पुढे वाचा ...

दुबई, 27 डिसेंबर : भारताची अंडर-19 टीमने आशिया कपच्या Under-19 Asia Cup) सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. भारतीय टीमने लीग राऊंडच्या रोमांचक सामन्यात अफगाणिस्तानचा (India vs Afghanistan) 4 विकेटने पराभव केला. भारताचा तीन मॅचमधला हा दुसरा विजय आहे. लीग स्टेजमध्ये टीमने युएईचा 21 रनने पराभव केला होता. या विजयासोबतच भारत आणि पाकिस्तानच्या टीम सेमी फायनलला पोहोचल्या आहेत. आता या दोन्ही टीम पुन्हा एकदा फायनलमध्ये एकमेकांविरुद्ध (India vs Pakistan) खेळू शकतात. याआधी लीग राऊंडमध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा अखेरच्या बॉलवर पराभव केला होता.

भारताविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानने पहिले बॅटिंग करत 4 विकेट गमावून 259 रन केले होते. कर्णधार सुलेमान सैफीने 86 बॉलमध्ये 73 रनची खेळीकेली होती, यात 7 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. याशिवाय इजाज अहमदने 68 बॉलमध्ये नाबाद 86 रनची आक्रमक खेळीकेली. खैबर वलीने 12 बॉलमध्ये नाबाद 20 रन केले.

या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या भारतीय टीमची सुरुवात चांगली झाली. हरनूर सिंगने 65 आणि अंगक्रिश रघुवंशीने 35 रन करत पहिल्या विकेटसाठी 104 रनची पार्टनरशीप केली. कर्णधार यश ढूल फक्त 26 रन करू शकला. भारतीय टीमने 197 रनवर 6 विकेट गमावल्या होत्या, पण राज बावा आणि कौशल तांबे यांच्यात नाबाद 65 रनची पार्टनरशीप झाली, त्यामुळे भारताने हे आव्हान 48.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. बावाने 55 बॉलमध्ये 43 रन केले, यात 2 फोर होत्या. तर तांबेच्या 35 रनच्या खेळीमध्ये 4 फोरचा समावेश होता, त्याने 29 बॉलचा सामना केला.

दुसरीकडे पाकिस्तानने अखेरच्या सामन्यात युएईचा पराभव केला. टीमने लीग राऊंडचे तिन्ही सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने पहिले बॅटिंग करत 8 विकेट गमावून 219 रन केले. कर्णधार कासीम अक्रमने सर्वाधिक 50 रनची खेळी केली, याशिवाय अहमद खान 21 बॉलमध्ये 34 रनवर नाबाद राहिला. अहमदनेच भारताविरुद्ध शेवटी आक्रमक खेळी करून पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता.

या आव्हानाचा पाठलाग करताना युएईने 76 रनवर 5 विकेट गमावल्या होत्या. पण कर्णधार आलीशानने 35 रन करून टीमला सावरलं, पण अखेर टीम 198/9 पर्यंतच पोहोचू शकली. कासिमने 52 रन देऊन 3 विकेट पटकावल्या.

First published:

Tags: India vs Pakistan