मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

VIDEO: IPL मध्ये डेब्यू करताच जिंकली सगळ्यांची मनं; तरीही का ढसाढसा रडू लागला हा काश्मिरी हिरो?

VIDEO: IPL मध्ये डेब्यू करताच जिंकली सगळ्यांची मनं; तरीही का ढसाढसा रडू लागला हा काश्मिरी हिरो?

IPL मध्ये डेब्यू करणारा काश्मिरी हिरो का रडू लागला ढसाढसा?

IPL मध्ये डेब्यू करणारा काश्मिरी हिरो का रडू लागला ढसाढसा?

आयपीएलच्या १४व्या (IPL2021)हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून जम्मू-काश्मीरचा उमरान मलिकने पदार्पण(Umram Malik Joined Sunrisers Hyderabad) केले. पदार्पणातच त्याने सर्वांची मने जिंकली.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर: आयपीएलच्या १४व्या (IPL2021)हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून जम्मू-काश्मीरच्या उमरान मलिकने पदार्पण(Umram Malik Joined Sunrisers Hyderabad) केले. पदार्पणातच त्याने सर्वांची मने जिंकली. त्याने पहिलाच चेंडू १५० किमीच्या वेगाने टाकला होता. भारतीय गोलंदाजाकडून टाकण्यात आलेला हा सर्वात वेगवान चेंडू ठरला. त्याच्या या कामगिरीची चर्चा होत असतानाच उमरानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये तो रडताना दिसत (umran malik debut in ipl 2021 for sunriser hyderabad emotional before debut )आहे.

अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खानने उमरानचा रडत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या लढती आधीचा हा व्हिडिओ आहे. सामना सुरू होण्याच्या आधी उमरानला त्याच्या कुटुंबीयांनी शुभेच्छा दिल्या. कुटुंबातील लोकांच्या शुभेच्छा स्विकार करताना उमरान भावुक झाला आणि त्याला अश्रु अनावर झाले.

उमरानने पदार्पणाच्या सामन्यात या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकला. एका बाजूला उमारनच्या या कामगिरीने सर्वजण त्याचे कौतुक करत असताना दुसऱ्या बाजूला त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उमरान ढसाढसा रडताना दिसतोय. अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खानने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय.

हा व्हिडिओ शेअर करताना राशिदने, 'काल सामना सुरू होण्याच्या ठिक आधी शुभेच्छा स्विकारताना आमचा युवा खेळाडू भावूक झाला.'' अशी कॅप्शन दिली आहे.

आयपीएलचे दुसरे सत्र सुरू होताना तो संघात नेट बॉलर म्हणून होता. पण टी नटराजनला करोनाची लागण झाल्याने उमरानचा संघात समावेश करण्यात आला. पदार्पणातच उमराने आपली चमक दाखवली.

कोण आहे उमरान मलिक?

जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये 1999 साली जन्म झालेल्या उमरान मलिकने जानेवारी 2021 मधील क्रिकेट संघात डेब्यू केला होता. उमरानने जम्मू-काश्मीरसाठी आतापर्यंत एक टी 20 आणि एक लिस्ट अ मॅच खेळली आहे. 21 वर्षाचाहा सुपरफास्ट गोलंदाज पूर्वीपासूनच नेट गोलंदाजीमध्ये हैदराबाद टीमचा भाग होता. त्याने जम्मू-कश्मीरसाठी टी 20 सामन्यात तीन विकेट घेतल्या होत्या.

First published: