मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs NZ ODI: 'स्पीड गन' सुसाट... 153 किमी वेगानं बॉलिंग, बॅट्समनला भरली धडकी; Video

Ind vs NZ ODI: 'स्पीड गन' सुसाट... 153 किमी वेगानं बॉलिंग, बॅट्समनला भरली धडकी; Video

उमरान मलिकचा भन्नाट वेग

उमरान मलिकचा भन्नाट वेग

Ind vs NZ ODI: उमरान मलिक ओळखला जातो तो त्याच्या वेगासाठी. आजच्या मॅचमध्येही त्यानं 153 च्या स्पीडनं केलेल्या बॉलिंगमुळे किवी फलंदाजांना धडकी भरली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

ऑकलंड, 25 नोव्हेंबर: वन डे क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये संधी मिळालेल्या जम्मू एक्स्प्रेस उमरान मलिकनं आपल्या कामगिरीनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. उमराननं न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वन डेत टाकलेला पहिलाच स्पेल भन्नाट होता. या स्पेलमध्ये त्यानं दोन विकेटही घेतल्या. पण सर्वात जास्त चर्चा झाली ती त्याच्या स्पीडची. उमरान मलिक ओळखला जातो तो त्याच्या वेगासाठी. आजच्या मॅचमध्येही त्यानं 153 च्या स्पीडनं केलेल्या बॉलिंगमुळे किवी फलंदाजांना धडकी भरली होती. त्याच्या याच स्पीडसमोर डेवॉन कॉनवे आणि डॅरिल मिशेल हे दोघे तगडे फलंदाज माघारी परतले.

मलिकचं यशस्वी पदार्पण  

उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग या भारताच्या युवा खेळाडूंनी आज भारताकडून पदार्पण केलं. पण  उमरानचं पदार्पण यशस्वी ठरलं. त्यानं आपल्या पहिल्या स्पेलमध्ये त्यानं 5 ओव्हरमध्ये 19 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्यात सेट झालेला डेवॉन कॉनवे आणि अनुभवी डॅरिल मिशेलचा समावेश होता.

हेही वाचा - Ind vs NZ ODI: आधी घेतली विल्यमसनची शाळा, मग बॉलर्सचा समाचार; पहिल्या वन डेत पाहा 'गब्बर'ची धमाल

टीम इंडियाचा धावांचा डोंगर

त्याआधी कॅप्टन शिखर धवनची आणि शुभमन गिलची शतकी सलामी आणि त्यानंतर श्रेयस अय्यरच्या दणकेबाज खेळीच्या जोरावर टीम इंडियानं 300 धावांचा टप्पा ओलांडला. धवननं वन डे क्रिकेटमधला आपला फॉर्म कायम ठेवताना 72 धावा फटकावल्या. तर शुभमन गिलनंही 50 धावांची खेळी साकारली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 124 धावांची भागीदारी केली. पण त्यानंतर श्रेयस अय्यरला नशीबाची साथ मिळाली आणि त्यानं 80 धावांचं योगदान दिलं. त्यात संजू सॅमसन (36) आणि वॉशिंग्टन सुंदरनंही (37) फटकेबाजी केली. त्यामुळे भारतानं 50 ओव्हर्समध्ये 7 बाद 306 धावा स्कोअर बोर्डवर लावल्या.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Sports, Team india