मुंबई, 02 फेब्रुवारी : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने 168 धावांनी विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 234 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने न्यूझीलंडला 66 धावात गुंडाळलं. भारतीय गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज ढेपाळले. वेगवान गोलंदाज उमरान मलिकने 2.1 षटकात 9 धावात 2 विकेट घेतल्या. यात त्याने मायकल ब्रेसवलची घेतलेली विकेट जबरदस्त होती.
उमरानने धोकादायक ठरणाऱ्या ब्रेसवेलला त्याच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर विकेट घेत न्यूझीलंडला पाचवा धक्का दिला. ब्रेसवेलने उमरानच्या चेंडूवर पुश शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू 155 किमी प्रतितास वेगाने टाकला होता. त्रिफळा उडाल्यानंतर एक बेल्स 30 यार्ड अंतरावर जाऊन पडली होती. सनरायजर्स हैदराबादने उमरानने घेतलेल्या या विकेटचा व्हिडीओ ट्विटरवरून शेअर केला आहे.
Just 1⃣5⃣0⃣ KMPH from the Jammu Express!!! ⚡️#UmranMalik #OrangeArmy #INDvNZ pic.twitter.com/gbPvOmH0QW
— SunRisers Hyderabad (@SunRisers) February 1, 2023
हेही वाचा : शुभमन गिलची गाडी सुसाट! शतक झळकावताच झाले अनेक विक्रम
भारताने अखेरच्या टी20 सामन्यात सलामीवीर शुभमन गिलच्या शतकी खेळीच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारली. त्याने 63 चेंडूत 126 धावा केल्या. याशिवाय राहुल त्रिपाठीने 22 चेंडूत 44 धावा केल्या. तर कर्णधार हार्दिक पांड्याने 30 आणि सूर्यकुमार यादवने 26 धावांची खेळी केली. भारताने तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. भारताने पहिला सामना गमावल्यानंतर सलग दोन सामन्यात विजय मिळवला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket