Home /News /sport /

Ind vs Aus W : एका 'नो बॉल'मुळं झाला घोटाळा; भारताच्या पराजयानंतर पंचांवर भडकले फॅन्स

Ind vs Aus W : एका 'नो बॉल'मुळं झाला घोटाळा; भारताच्या पराजयानंतर पंचांवर भडकले फॅन्स

बेथ मूनीच्या (Beth Mooney) बॅटनं फटका लागल्यानंतर मिडविकेटवर उभ्या क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू आला. मात्र, हाच चेंडू 'नो बॉल' दिला गेला. हा निर्णय आता वादग्रस्त ठरला असून याआधीही पंचांच्या निर्णयामुळं सामना फिरल्याच्या घटना घडल्या आहेत.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : भारतीय महिला क्रिकेट संघ (Indian Women's Cricket Team) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात दुसऱ्या एकदिवसीय (2nd ODI) मध्ये वाद निर्माण झाला. खरं तर टीम इंडिया (Team India) विजय मिळवल्यातच जमा होती, पण पंचांच्या निर्णयाने खेळाची बाजी पलटवली. शेवटचा चेंडूमुळं वाद भारत आणि ऑस्ट्रेलिया (INDW Vs AUSW) यांच्यातल्या या सामन्याच्या शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी कांगारूंना 3 धावांची गरज होती. तीन धावा पळून मिळवणं तसं कठीणच असल्यानं अशा स्थितीत कोणताही खेळाडू चार धावा मिळवण्याच्या उद्देशानं चेंडू उचलून मारण्याच्या प्रयत्नात असतो. यामध्ये टायमिंग चुकल्यास विकेट पडण्याची दाट शक्यता असते आणि ऑस्ट्रेलियासोबत तसंच झालं. अनुभवी खेळाडू झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) टीम इंडियासाठी गोलंदाजी करत होती. बेथ मूनीच्या (Beth Mooney) बॅटनं फटका लागल्यानंतर मिडविकेटवर उभ्या क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू आला. मात्र, हाच चेंडू 'नो बॉल' दिला गेला. हा निर्णय आता वादग्रस्त ठरला असून याआधीही पंचांच्या निर्णयामुळं सामना फिरल्याच्या घटना घडल्या आहेत. हे वाचा - अखेर Team India चा पराभव! शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियन महिलांची बाजी पंचांच्या निर्णयानं सामना फिरला भारतीय महिला खेळाडूंनी विजय साजरा करायला सुरुवात केली. पण सामन्यात अजूनही नाट्य बाकी होतं. मैदानातल्या पंचांनी तिसऱ्या पंचांनी (Third Umpire) काहीतरी विचारलं आणि चेंडूला 'नो बॉल' (No Ball) घोषित केलं. ऑस्ट्रेलियाला एका धावेसह एक 'फ्री हिट' मिळाला आणि आता यजमानांना केवळ 2 धावा करायच्या होत्या. हे तुलनेनं सोपं झालेलं लक्ष्य त्यांनी पूर्ण केलं आणि या चेंडूवर कांगारूंनी विजय मिळवला. पण पंचांच्या या निर्णयावर गदारोळ सुरू झालाय. चाहत्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आता या 'नो बॉल'बद्दल सोशल मीडियावर वाद सुरू झालाय. अनेक चाहत्यांचा असा विश्वास आहे की हा चेंडू व्यवस्थित टाकला गेला होता. तरीही त्याला 'नो बॉल' घोषित करण्यात आलं. एका वापरकर्त्यानं 'हा जर हा पुरुषांचा सामना असता तर, असं केलं गेलं नसतं. थर्ड अंपायर विराट कोहलीच्या (Virat Kohli) उपस्थितीत असा निर्णय देऊ शकला नसता. हे वाचा - IPL 2021: अर्जून तेंडुलकरच्या रुमवर अनोखा ‘छापा’, लॉकरमधील सामानाचा VIDEO होतोय VIRAL ऑस्ट्रेलियन दिग्गजांनीही प्रश्न उपस्थित केले ऑस्ट्रेलियाची माजी क्रिकेटपटू लिसा स्थॅलेकारनं (Lisa Sthalekar) तिच्या ट्विटर अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. शेवटच्या चेंडूला 'नो बॉल' कोणत्या आधारावर म्हटलं गेलं, हे मी स्वतःच समजू शकत नाही, असं तिनं म्हटलंय.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: India vs Australia, Indian women's team

    पुढील बातम्या