उमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी

भारतीय खेळपट्ट्या या फिरकी गोलंदाजीला पोषक समजल्या जातात. त्यामुळे या खेळपट्ट्यांवर विकेट मिळवताना वेगवान गोलंदाजांना कसरत करावी लागते.

  • Share this:

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ‘विदर्भ एक्सप्रेस’ अर्थात उमेश यादवने धारदार गोलंदाजी केली. उमेशने या सामन्यात 133 धावा देत 10 विकेट्स मिळवल्या. उमेशची ही कामगिरी भारतीय क्रिेकेटसाठीही फार महत्त्वाची आहे.

भारतीय खेळपट्ट्या या फिरकी गोलंदाजीला पोषक समजल्या जातात. त्यामुळे या खेळपट्ट्यांवर विकेट मिळवताना वेगवान गोलंदाजांना कसरत करावी लागते. 19 वर्षांपासून कोणताही भारतीय वेगवान गोलंदाज घरच्या मैदानावर एकाच सामन्यात 10 विकेट्स घेऊ शकला नव्हता. उमेश यादवच्या आधी केवळ दोनच भारतीय जलदगती गोलंदाजांनी ही कामगिरी केली आहे.

जवागल श्रीनाथ यांनी 1999 साली पाकिस्तानविरुद्ध कोलकत्ता कसोटीत 132 धावा देऊन 13 विकेट्स मिळवल्या होत्या

उमेश आणि जवागल यांच्या आधी माजी कर्णधार कपिल देव यांनी हा करिश्मा केला होता. कपिल यांनी मायभूमीत दोन वेळा एकाच कसोटीत 10 विकेट्स मिळवण्याची कामगिरी केली होती.

कपिल देव यांनी सर्वात आधी 1980 साली पाकिस्तानविरुद्ध 146 धावांत 11 विकेट्स मिळवल्या. त्यानंतर तीन वर्षांनी त्यावेळच्या चॅम्पियन संघाविरुद्ध अर्थात वेस्ट इंडिजविरुद्ध ही अद्भुत कामगिरी करून दाखवली होती. या सामन्यात त्यांनी 135 धावा देऊन 10 फलंदाजांना माघारी धाडलं होतं.

Loading...

आता 19 वर्षानंतर उमेश यादवने ही कामगिरी करून दाखवली आहे. त्यामुळे त्याने कपिल देव आणि जवागल श्रीनाथ यांच्यासारख्या दिग्गज गोलंदाजांच्या यादीत स्थान मिळवलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2018 06:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...