U19 World Cup 2020 : टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणार मुंबईचे 3 हुकुमी एक्के!

U19 World Cup 2020 : टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणार मुंबईचे 3 हुकुमी एक्के!

पुढच्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत अंडर-19 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. यासाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली.

  • Share this:

मुंबई, 02 डिसेंबर : पुढच्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत अंडर-19 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धा ही 19 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान खेळवली जाणार आहे. टीम इंडिया तब्बल पाचव्यांदा विजेतेपदाचा किताब जिंकण्यासाठी मैदानात उतरेत. संघाचे कर्णधारपद हे प्रियम गर्गकडे देण्यात आले आहे. दरम्यान ही स्पर्धा जिंकण्यासाठी युवा ब्रिगेड सज्ज असून या संघात तीन मुंबईकर खेळाडूंचा समावेश आहे.

दरम्यान अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. त्यानंतर दक्षिण अफ्रीका U-19, भारत U-9, झिम्बाब्वे U-19 आणि न्यूजीलैंड U-19 यांच्यात एक मालिका खेळली जाणार आहे.

अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. 2018मध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतानं पहिला वर्ल्ड कप जिंकला होता. आता टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत गतविजेते म्हणून उतरणार आहे. अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन 17 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. यात एकूण 48 सामने होणार आहे. 16 संघाचे 4 ग्रुपमध्ये विभागणी करण्यात आली आहे. टीम इंडियाच्या गटात जपान, न्यूजीलॅंड आणि श्रीलंका हे संघ असतील. या अंडर-19 भारतीय संघात यशस्वी जयस्वाल, दिव्यांश सक्सैना आणि अर्थव अंकोलकर हे तीन मुंबईकर खेळाडू खेळणार आहेत.

वाचा-पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी झाली टीम इंडियाची घोषणा

यशस्वी जयस्वाल

यशस्वी जयस्वाल या मुंबईकर खेळाडूचे नाव चर्चेत आले ते विजय हजारे करंडकमध्ये. यशस्वीनं या स्पर्धेत वयाच्या 17व्या वर्षी या स्पर्धेत द्विशतक करण्याची कामगिरी केली. द्विशतकी खेळीसह यशस्वी सर्वात कमी वयात 200 धावा करणारा खेळाडू ठरला आहे. मुंबईकर खेळाडूनं 6 सामन्यात 564 धावा केल्या. यशस्वीनं गोवा संघाविरोधात 113 तर केरळ विरोधात 113 धावांची खेळी केली. याशिवाय झारखंड विरोधात दुहेरी शतक करण्याची कामगिरी केली. यशस्वीनं आपल्या वेगळ्या फलंदाजी शैलीनं सगळ्यांचे मन जिंकले आहे. हा तोच यशस्वी आहे, जो कधी मुंबईमध्ये पाणीपुरीची गाडी लावायचा. मात्र एकेदिवशी आझाद मैदानात क्रिकेट खेळत असताना त्यानं हातात घेतलेली बॅट पुन्हा खाली ठेवली नाही. विशेष म्हणजे यशस्वीच्या यशामागे अर्जुन तेंडुलकरचा मोठा हात आहे.

वाचा-विजयाच्या आधीच केला जल्लोष आणि 4 चेंडूत गमावला सामना

अर्थव अंकोलेकर

ICC Under 19 Asia Cupमध्ये भारतानं सातव्यांदा आशियाई कपचा किताब मिळवला. यात चर्चेचा विषय ठरला तो मुंबईकर अथर्व अंकोलेकर. अथर्वनं अंतिम सामन्यात 8 ओव्हरमध्ये 28 धावा देत 5 विकेट घेत भारताला विजेतेपद मिळवून दिले. मुख्य म्हणजे अथर्व दहा वर्षांचा असताना 2019मध्ये बेस्टमध्ये कंडक्टर असलेल्या त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर अथर्वची आई वैदही अंकोळेकर यांनी कंडक्टरची नोकरी स्विकारत अर्थवला वाढवले. अर्थव डावखुरा फिरकीपटू असून सध्या रिझवी कॉलेजमध्ये 12वीचे शिक्षण घेत आहे. 9 वर्षांपूर्वी एका सराव सामन्यादरम्या अथर्वनं मास्टर ब्लास्टर सचिनला बाद केले होते. सचिनचं त्याच्या गोलंदाजीचे कौतुक केले होते. सचिनला बाद केल्यानंतर त्यांनी स्वत:ची सही असलेली एक बॅटही बक्षिस म्हणून अथर्वला दिली होती.

वाचा-टीम इंडियाचा क्रिकेटपटू अभिनेत्रीसोबत आज लग्नाच्या बेडीत, पाहा PHOTO

दिव्यांश सक्सेना

मुंबईकर दिव्यांशची भारतीय संघासाठी खेळण्याची ही पहिला वेळ नाही आहे. याआधी भारत अ संघाकडून खेळला होता. नुकत्याच नेपाळमध्ये झालेल्या बीसीसीआय चॅलेंज ट्रॉफीमध्ये दिव्यांशनं 89 धावांची खेळी केली होती. त्याआधी फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिका विरोधात झालेल्य मालिकात भारताकडून पदार्पण केले होते. आपल्या पहिल्याच सामन्यात त्यानं 224 चेंडूत 122 धावांची खेळी केली होती. दिव्यांशकडे मुंबई अंडर-19 संघाचे कर्णधारपदही भुषवले होते.

वाचा-क्रिकेटमध्ये खेळला जातोय ‘अजित पवार’ शॉट, तुम्ही तरी पाहिलात का?

भारताचा U-19 संघ: यशस्वी जयस्वाल (मुंबई), तिळक वर्मा (हैदराबाद), दिव्यांश सक्सेना (मुंबई), प्रियम गर्ग (कर्णधार- उत्तर प्रदेश), ध्रुव चंद जुरेल (उप कर्णधार, उत्तर प्रदेश), शाश्वत रावत (बडोदा), दिव्यांश जोशी (मिझोरम), शुभांग हेगड़े (कर्नाटक), रवी बिश्नोई (राजस्थान), आकाश सिंह (राजस्थान), कार्तिक त्यागी (उत्तर प्रदेश), अथर्व अंकोलेकर (मुंबई), कुमार कुशाग्र (विकेट कीपर- झारखंड), सुशांत मिश्रा (झारखंड), विद्याधर पाटिल (कर्नाटक).

First published: December 2, 2019, 2:46 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading