Home /News /sport /

Pro Kabaddi League : U Mumba चा तरुण खेळाडूंवर विश्वास, प्रो कबड्डी लीगच्या आठव्या सिझनसाठी तयारी सुरु

Pro Kabaddi League : U Mumba चा तरुण खेळाडूंवर विश्वास, प्रो कबड्डी लीगच्या आठव्या सिझनसाठी तयारी सुरु

पीकेएल लिलावाच्या पहिल्या दोन दिवसांत केवळ एका खेळाडूला करारबद्ध केल्यानंतर, यू मुंबानं तिसऱ्या दिवशी ब आणि क श्रेणीतील अनेक खेळाडूंना खरेदी केलं. त्यामुळे संघामध्ये अनेक तरुण रायडर्सचा समावेश झाला आहे.

मुंबई, 23 नोव्हेंबर : येत्या 22 डिसेंबरपासून व्हिवो प्रो कबड्डी लीगच्या (VIVO Pro Kabaddi League) (PKL Season 8) आठव्या सिझनला  सुरुवात होणार आहे. खेळाडूंचे लिलाव पार पडले असून आता सर्व संघ सराव आणि रणनीती आखण्यात व्यग्र होणार आहेत. लिलावादरम्यान, सर्व फ्रँचायझींनी (Franchise) त्यांच्या संघ संयोजनाचा विचार केलेला आहे. त्यांनी शक्य तितक्या चांगल्या खेळाडूंची निवड करून एक समतोल संघ बनवण्याचा प्रयत्न करण्यावर भर दिलेला आहे. पीकेएलमधील सर्व संघाचा आढावा घेतला तर 'यू मुंबा'मध्ये (U Mumba) सर्वात जास्त नवीन तरुण खेळाडूंचा भरणा असल्याचं दिसतं. 'सुलतान' फझल अत्राचलीनं (Fazel Atrachali) सीझन 6 मध्ये संघाचं कर्णधारपद स्वीकारल्यापासून यू मुंबानं कायम नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी दिलेली आहे. आतापर्यंत सुलतानच्या नेतृत्त्वात संघानं सिद्धार्थ देसाई, अभिषेक सिंग आणि अर्जुन देशवाल यांसारख्या खेळाडूंना तयार केलं आहे. पुढच्या महिन्यात येऊ घातलेल्या आठव्या सिझनमध्येही यू मुंबा तरुणतुर्कांच्या बळावर जेतेपदासाठी दावा ठोकणार आहे. पीकेएलच्या अधिकृत वेबसाईटनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. पीकेएल लिलावाच्या पहिल्या दोन दिवसांत केवळ एका खेळाडूला करारबद्ध केल्यानंतर, यू मुंबानं तिसऱ्या दिवशी ब आणि क श्रेणीतील अनेक खेळाडूंना खरेदी केलं. त्यामुळे संघामध्ये अनेक तरुण रायडर्सचा समावेश झाला आहे. सीझन आठच्या लिलावापूर्वीच यू मुंबानं कर्णधार फझल अत्राचलीला एलिट रिटेन्ड प्लेअर (Elite Retained Player) म्हणून कायम केलं होतं. मूळचा इराणी खेळाडू असलेल्या अत्राचलीनं आपल्या कंबर आणि घोट्याच्या मुव्हच्या जोरावर मॅटवर आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे. लीगच्या इतिहासात 300 पेक्षा जास्त टॅकल पॉइंट्स मिळवणारा तो एकमेव परदेशी डिफेंडर (defender) आहे. गेल्या दोन सिझनमध्ये फझलनं 80 पेक्षा जास्त टॅकल पॉईंट्स (tackle points) मिळवले आहेत. मागील सीझनप्रमाणं या सीझनमध्येही फझल संघातील नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करेल. Ravi Shastri होणार आयपीएलमधील नव्या संघाचे प्रशिक्षक? शास्त्रींनी केला खुलासा
आशिष सांगवान, अजित, सुनील सिद्धगवळी आणि हरेंद्र कुमारसारखे कुशल कव्हर डिफेंडर आपल्या कर्णधाराला मदत करण्यास सज्ज आहेत. बंगळुरू बुल्ससाठी 83 सामने खेळून 157 गुण मिळवणारा आशिष सांगवान (Ashish Sangwan) लीगमध्ये पहिल्यांदाच वेगळ्या जर्सीत दिसणार आहे. बाकीच्या बचावपटूंची भूमिकाही महत्त्वपूर्ण असेल. कारण त्यांना 'सुलतान'भोवती सुरक्षाकडं उभं करावं लागेल. यूपी योद्धा आणि गुजरात जायंट्सचा माजी डिफेंडर असलेला पंकज रावलकडे (Pankaj Rawal) पर्यायी व्यवस्था म्हणून लेफ्ट कॉर्नरची जबाबदारी असेल. उजव्या कॉर्नर पोझिशनसाठी यू मुंबानं रिंकू शर्मा (Rinku Sharma) आणि राहुल रावल (Rahul Rawal) या दोन प्रतिभावान खेळाडूंना संघामध्ये घेतलं आहे. चंडिगडस्थित रिंकू शर्मा आपल्या अँकल होल्ड आणि डाईव्हसाठी ओळखला जातो. त्यानं 67व्या आणि 68व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये आपल्या राज्यासाठी अव्वल डिफेंडरची भूमिका बजावली होती. या वर्षीच्या पीकेएल लिलावात यू मुंबानं सर्वात जास्त म्हणजे 32 लाख रुपये खर्च करून 20 वर्षीय रिंकूची खरेदी केली. राहुल रावलनं ज्युनियर नॅशनलमध्ये स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) साठी दोन वेळा सुवर्णपदक जिंकलेलं आहे. रिंकूप्रमाणं तो देखील एक भरोशाचा डिफेंडर ठरू शकतो. सराव करताना Virat Kohli मांजरीसोबत दिसला खेळताना, अनुष्का म्हणाली... अभिषेक आणि अजित जोडीवर रेडिंगची मदार  यू मुंबानं लिलावापूर्वीच आपला स्टार रेडर (Raider) अभिषेक सिंगला (Abhishek Singh) संघात कायम ठेवलं होतं. मागील सिझनमध्ये त्यानं 162 रेड पॉइंट आणि 10 'सुपर-10' मिळवून आपल्या संघातील रेडर्सचं नेतृत्व केलं होतं. या सीझनमध्येही अभिषेकला संघासाठी मुख्य रेडर म्हणून आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागणार आहे. सीझन 7 मध्ये तमिळ थलायवाचा रेडर असलेल्या व्ही. अजित कुमारसाठी यू मुंबानं 25 लाख खर्च केले आहेत. या चपळ रेडरनं आतापर्यंत 121 रेड पॉईंट आणि पदार्पणात 4 सुपर-10 मिळवलेले आहेत. एका सामन्यात 18 पाइंट्स हा त्याचा आतापर्यंतचा सर्वोच्च स्कोअर आहे. आगामी सीझनमध्ये अजित, अभिषेकसाठी परफेक्ट जोडीदार ठरू शकतो. या दोन्ही खेळाडूंची सातत्यपूर्ण कामगिरी आणि कौशल्य पाहता ते संकटाच्या परिस्थितीतही संघासाठी खेळू शकतात. त्यामुळे रेडिंगच्याबाबतीत यू मुंबा अभिषेक-अजित जोडीवर अवलंबून असेल. यू मुंबाच्या इतर रेडर्सपैकी कमलेश, जशनदीप सिंग, राहुल राणा आणि शिवम ठाकूर फ्रँचायझीसाठी फायद्याचे ठरू शकतात. हे तरुण खेळाडू सीझन 8 मध्ये मॅटवर उतरण्यास उत्सुक आहेत. मोहसेन मगसौदलो, नवनीत आणि अजिंक्य कापरे सारखे इतर खेळाडूदेखील संघाला बळ देतील. एकूण नेहमीप्रमाणं या सिझनमध्येही यू मुंबाचा संघ पीकेएलच्या यावर्षीच्या (2021) सिझनमध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहे. या सर्व खेळाडूंचं नेतृत्व करण्याची जबाबदारी अनुभवी फजल अत्राचलीवर आहे.
First published:

Tags: Pro kabaddi, Pro kabaddi league, Sports

पुढील बातम्या