News18 Lokmat

प्रतिस्पर्धी संघाच्या या स्त्रिया एकमेकींच्या प्रेमात , लग्नाचे PHOTO व्हायरल

या नवविवाहित जोडप्याचे फोटो पाहून तर चक्क मेलबर्न स्टार्सनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 19, 2019 06:58 PM IST

प्रतिस्पर्धी संघाच्या या स्त्रिया एकमेकींच्या प्रेमात , लग्नाचे PHOTO व्हायरल

मेलबर्न, 19 एप्रिल : हल्ली समलिंगी विवाह ही गोष्ट काही नवीन नाही. म्हणजे आता भारतातही या गोष्टीला मोठ्या मनानं स्विकारलं जात. पण आज चक्क दोन प्रतिस्पर्धी संघाच्या महिला खेळाडूंनी आपल्या प्रेमाच्या नात्याला विवाहाचं नाव दिलं आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील या महिला खेळाडूंनी आज चक्क लग्नगाठ बांधली. न्यूझीलंड संघाकडून खेळणारी महिला क्रिकेटपटू हेली जेनसन आणि ऑस्ट्रेलियाकडून खेळणारी निकोला हॅनकॉक या दोघी आता एकमेकींच्या जीवनासाथी बनल्या आहेत.
Loading...

 

View this post on Instagram
 

Congrats @hayleyjensen17 & @nichancock44 🙌 you guys looked amazing! So happy for you!


A post shared by Marizanne Kapp (@kappie777) on

सध्या या दोघींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या नवविवाहित जोडप्याचे फोटो पाहून तर चक्क मेलबर्न स्टार्सनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केले आहेत. जगभरातील चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत.

हेली जेलसन हीनं न्यूझीलंडकडून 7 एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळले आहेत. ती न्युझीलंडची जलदगती गोलंदाज आहे. तर, ऑस्ट्रेलियाची निकोला हॅनकॉकनं सध्या मेलबर्न स्टार्ससाठी बिग बॅश लीगमध्ये क्रिकेट खेळते. अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणच केलेलं नाही. याआधी, दक्षिण भारत क्रिकेट संघाची अष्टपैलू खेळाडू डेन वेन निकर्क आणि जलदगती गोलंदाज मारिजाने कॅप यांनी लग्नगाठ बांधली होती.


VIDEO : प्रकाश आंबेडकरांची राज ठाकरेंवर सडकून टीका, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 19, 2019 06:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...