मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

मुंबई क्रिकेट पुन्हा वादात, नातेवाईकांना कोच आणि ट्रेनर केल्यामुळे दोन सदस्यांचं निलंबन

मुंबई क्रिकेट पुन्हा वादात, नातेवाईकांना कोच आणि ट्रेनर केल्यामुळे दोन सदस्यांचं निलंबन

मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) पुन्हा एकदा वादात सापडलं आहे. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार लोकायुक्तांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कमिटीच्या दोन सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. उन्मेश खानविलकर (Unmesh Khanvilkar) आणि किरण पोवार (Kiran Powar) या दोघांना परस्पर हितसंबंधांच्या मुद्द्यावरून एमसीएच्या समितीवरून अपात्र ठरवण्यात आलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 29 डिसेंबर : मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) पुन्हा एकदा वादात सापडलं आहे. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार लोकायुक्तांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कमिटीच्या दोन सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. उन्मेश खानविलकर (Unmesh Khanvilkar) आणि किरण पोवार (Kiran Powar) या दोघांना परस्पर हितसंबंधांच्या मुद्द्यावरून एमसीएच्या समितीवरून अपात्र ठरवण्यात आलं आहे.

मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्हीके तहिलरमाणी यांनी या प्रकरणात समितीच्या सदस्यांमुळे परस्पर हितसंबंधांना बाधा येत असल्याचं सांगितलं. उन्मेश खानविलकर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी संयुक्त सचिव होते, तर किरण पोवार मुंबईचे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू होते. लोकायुक्तांनी दिलेल्या या निकालामुळे आता दोघांनाही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कोणत्याही कामात सहभागी होता येणार नाही.

संयुक्त सचिव उन्मेश खानविलकर यांची बहिण चित्रा खानविलकर यांना मुंबई महिला क्रिकेट टीमचं ट्रेनर करण्यात आलं, हे परस्पर हितसंबंधांना बाधा आणणारं आहे, असं निवृत्त न्यायाधीश तहिलरमाणी म्हणाले. तसंच उन्मेश खानविलकर यांचा एमसीएमधला 6 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. पहिले ते 17 जून 2015 ते 3 ऑक्टोबर 2019 दरम्यान ते एमसीएचे संयुक्त सचिव होते, यानंतर 4 ऑक्टोबर 2019 ते आतापर्यंत ते एमसीएच्या ऍपेक्स काऊन्सिलचे सदस्यही आहेत, त्यामुळे त्यांना कुलिंग ऑफ काळात जाणं गरजेचं आहे, असा निकाल तहिलरमाणी यांनी दिला.

किरण पोवार ऍपेक्स काऊन्सिलचे सदस्य असताना त्यांचा भाऊ रमेश पोवार यांना मुंबई टीमचं प्रशिक्षक बनवण्यात आलं, हादेखील परस्पर हितसंबंधांचा मुद्दा असल्याचं निवृत्त न्यायाधीशांनी सांगितलं. यामुळे किरण पोवार यांना एका वर्षासाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे. किरण पोवार यांचा भाऊ रमेश पोवार सध्या भारतीय महिला टीमचा प्रशिक्षक आहे.

First published: