दोन भावांनी 2014पासून केल्या सगळ्या मॅच फिक्स, ICCनं घातली आजीवन बंदी

आयसीसीच्या वतीनं क्रिकेट सामन्यात फिक्सिंग केल्याप्रकरणी दोन खेळाडूंवर आजीवन बंदी घालण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 26, 2019 08:56 PM IST

दोन भावांनी 2014पासून केल्या सगळ्या मॅच फिक्स, ICCनं घातली आजीवन बंदी

नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : आयसीसीच्या वतीनं क्रिकेट सामन्यात फिक्सिंग केल्याप्रकरणी दोन खेळाडूंवर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. आयसीसीनं हॉंगकॉंगच्या दोन खेळाडूंवर ही कारवाई केली आहे. इरफान अहमद आणि नदीम अहमद अशा या खेळाडूंची नावे आहे. हे दोन्ही खेळाडू फिक्सिंग करताना दोषी आढळले आहे. दरम्यान, याआधी आयसीसीच्या वतीनं पाच वर्षांपूर्वी हॉंगकॉंगच्याच हसीव अमजद याच्यावर बंदी घालण्यात आली होती. या तीन खेळाडूंनी गेल्या दोन वर्षात अनेक आंतराराष्ट्रीय सामने फिक्स केले आहे.

इरफान अहमदनं या सामन्यांचे केले फिक्सिंग

इरफाननं 13 जानेवारी 2014मध्ये हॉंगकॉंग आणि स्कॉटलॅंड यांच्यात झालेल्या सामना, 17 जानेवारी 2014मध्ये हॉंगकॉंग आणि कॅनाडा मॅच, 12 मार्च 2014मध्ये झिम्बावे विरोधात झालेल्या सामन्यात मॅच फिक्सिंग केली. याच बरोबर इरफाननं 2014मध्ये आयसीसी वर्ल्ड कप टी-20 साठी झालेल्या क्वालिफायर सामन्यातही फिक्स करण्यासाठी पैसे घेतले होते. इरफाननं 2016मध्ये आयसीसी वर्ल्ड टी-20 क्रिकेटमध्येही सामना फिक्स करण्यात आला होता.

वाचा-असा षटकार दररोज मारला जात नाही, पाहा बेन स्टोकचा अफलातून सिक्सर!

असे आहे इरफानचा करिअर

नदीम अहमदचा छोटा भाऊ इरफान अहमदचा जन्म 20 नोव्हेंबर 1989मध्ये पाकिस्तानमध्ये झाला. हॉंगकॉंगमध्ये ऑलराऊंडर खेळाडू असलेल्या इरफाननं 6 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात 99 धावा केल्या आहेत. तसेच 8 विकेटही घेतल्या आहेत. तसेच इरफाननं 8 टी-20 क्रिकेटमध्ये 76 धावा करत 11 विकेट घेतल्या आहेत.

वाचा-कॅरेबियन मैदानात कॅप्टन कोहलीचा दांडिया डान्स, VIDEO VIRAL

कोण आहे नदीम अहमद

28 डिसेंबर 1987मध्ये पाकिस्तानमध्ये जन्म झालेल्या नदीमनं हॉंगक़ॉंगमधून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. फिरकीपटू नदीमनं 25 एकदिवसीय सामन्यात 38 विकेट घेतल्या आहेत. यात 26-4 ही त्याची सर्वोश्रेष्ठ गोलंदाजी राहिली आहे. त्यानं तापर्यंत 24.52च्या सरासरीनं गोलंदाजी केली आहे.

वाचा-टेस्ट क्रिकेटच्या 'वर्ल्ड कप'मध्ये टीम इंडिया सुसाट, पाहा कोण कितव्या स्थानी

SPECIAL REPORT : सोनं अचानक इतकं महाग का झालं?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2019 08:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...