मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

पाकच्या हिंदू क्रिकेटरला 'इस्लाम' स्वीकारण्याची जबरदस्ती, पाहा त्यानं दिलेलं सडेतोड उत्तर

पाकच्या हिंदू क्रिकेटरला 'इस्लाम' स्वीकारण्याची जबरदस्ती, पाहा त्यानं दिलेलं सडेतोड उत्तर

हिंदू खेळाडू सध्या इस्लाम स्वीकारण्याच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देऊन अनेकांची तोंड बंद करत असल्यामुळे चर्चेत आला आहे.

हिंदू खेळाडू सध्या इस्लाम स्वीकारण्याच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देऊन अनेकांची तोंड बंद करत असल्यामुळे चर्चेत आला आहे.

हिंदू खेळाडू सध्या इस्लाम स्वीकारण्याच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देऊन अनेकांची तोंड बंद करत असल्यामुळे चर्चेत आला आहे.

  • Published by:  Manoj Khandekar

लाहोर, 31 जानेवारी : पाकिस्तानचा संघातून क्रिकेटच्या मैदानात उतरलेला हिंदू खेळाडू सध्या इस्लाम स्वीकारण्याच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देत आहे. आपल्या उत्तरानं तो अनेकांची तोंड बंद करत असल्यामुळे पुन्हा एकदा हा क्रिकेटर चर्चेत आला आहे. या क्रिकेटपटूचं नाव आहे दानिश कनेरियाबद्दल. सोशल मीडियावर सक्रीय असणारा 39 वर्षीय दानिश आपल्या चाहत्यांशी अधूनमधून संवाद साधत असतो. अशा वेळी त्याला अनेक मुद्द्यांवर प्रश्न विचारले जातात. यावेळी दानिशसमोर आलेला प्रश्न काहीसा संवेदनशील असाच होता. परंतु, या प्रश्नावरही दानिशने आपल्या शैलीत उत्तर देत नेटिझन्सना योग्य तो संदेश दिला आहे.

ट्विटरवर #AskDanish या सेशनदरम्यान, दानिशला त्याच्या चाहत्याकडून एक प्रश्न विचारण्यात आला. दानिशला इस्लामचा स्वीकार करण्याचं आवाहन केलं. इस्लामच सर्व काही आहे, असंही यावेळी दानिशला सांगण्यात आलं.या प्रश्नाला दानिशनंही पटकन उत्तर दिलं. ‘आपल्यासारख्या अनेकांनी हा प्रयत्न केला. परंतु, त्यांना यश आलं नाही.’, अशा शब्दात दानिशनं चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर दिलं.

आमना गुल या अकाऊंटवरून हा प्रश्न दानिशला विचारण्यात आला होता. यावेळी, ‘इस्लाम सोडून काहीच नाही. इस्लामशिवाय तुमचं जीवन हे मृत्यूसारखं आहे. तुम्ही इस्लाम स्वीकारा’, असं या युजरकडून सांगण्यात आलं. ‘हिंदू असल्याचा गर्व आहे’, असंही उत्तर दानिशनं एका युजरला दिलं.

यावेळी आणखी एका युजरनं दानिशला विचारलं की, ‘तुम्हाला पाकिस्तान सुरक्षित वाटत नाही का?’, यालाही दानिशने उत्तर दिलं. ‘मी इथं पूर्णपणे सुरक्षित आहे. माझ्यासोबत शब्दांनी खेळू नका’, असं दानिशने म्हटलं.

दानिश कनेरिया गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात चर्चेत आला होता. यावेळी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने वादग्रस्त विधान केलं होतं. काही पाकिस्तानी क्रिकेटर दानिश हिंदू असल्यामुळे त्याच्यासोबत जेवण्यास तयार नव्हते. या वक्तव्यानंतर, अख्तरने सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. आपलं वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आल्याचं अख्तरने सांगितले.

4 चेंडूत 4 धावा हव्या असताना रोहित स्टाइल षटकार, हरमनप्रीतचा VIDEO पाहिलात का?

First published:

Tags: Cricket, Ind vs pak