धक्कादायक! 8 वर्षांआधीच ट्विटरवर झाली होती कोबी ब्रायंटच्या मृत्यूची भविष्यवाणी

धक्कादायक! 8 वर्षांआधीच ट्विटरवर झाली होती कोबी ब्रायंटच्या मृत्यूची भविष्यवाणी

जगातील सर्वात प्रसिद्ध आणि दिग्गज बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंट यांचे 26 जानेवारी रोजी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले.

  • Share this:

कॅलिफोर्निया, 28 जानेवारी : जगातील सर्वात प्रसिद्ध आणि दिग्गज बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंट यांचे 26 जानेवारी रोजी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर केवळ क्रीडाविश्वात नाही तर जगभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. 8 वर्षांपूर्वीच एका व्यक्तीने ट्विटरवर कोबीचा मृत्यू हेलिकॉप्टर अपघातात होईल अशी भविष्यवाणी केली होती.

@dotNoso नावाच्या ट्विटर युझरने 14 नोव्हेंबर 2012 रोजी अशी भविष्यवाणी केली होती की, कोबी ब्रायंटचा मृत्यू एका हेलिकॉप्टर अपघातात होईल. ही भविष्यवाणी खरी झाल्यानंतर आता ते ट्वीट इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

वाचा-हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये प्राण गमावणाऱ्या कोबीचं बास्केटबॉलला प्रेमपत्र, पाहा VIDEO

वाचा-‘तुझी जादू पाहण्यासाठी पहाटे उठायचो’, कोबी ब्रायंटच्या मृत्यूनंतर विराट भावूक

ट्विटर युझरने ही भविष्यवाणी खरी ठरल्यानंतर, त्याला या युझरबाबत राग व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर विविध मिम्सही तयार केले जात आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. 41 वर्षीय कोबीसह त्याच्या 13 वर्षांच्या मुलीचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.

वाचा-हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये दिग्गज बॉस्केटबॉलपटूसह 13 वर्षांच्या लेकीचा मृत्यू!

कोबी ब्रायंटने आपल्या 20 वर्षांच्या कारकीर्दीत अनेक विक्रम केले. कोबी ब्रायंटने नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनकडून खेळताना 5 स्पर्धाही जिंकल्या. कोबी त्याच्या करिअरमध्ये 18 वेळा 'एनबीए ऑल स्टार' ठरला. तर, 2016मध्ये तिसऱ्या सर्वात मोठ्या ऑल स्टार खेळाडूनं निवृत्ती जाहीर केली. कोबी ब्रायंटने 2012 आणि 2008च्या ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेसाठी दोन सुवर्णपदकेही जिंकली होती.

वाचा-कोबी ब्रायंटने 20 वर्षांच्या करिअरमध्ये केली रेकॉर्डब्रेक कमाई

कोबीच्या मृत्यूमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यासह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामासह अनेकांनी दु:ख व्यक्त केले होते.

First published: January 28, 2020, 10:25 AM IST
Tags:

ताज्या बातम्या