मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /BREAKING : एमएस धोनीच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्लू टिक हटवली, हे आहे कारण

BREAKING : एमएस धोनीच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्लू टिक हटवली, हे आहे कारण

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या (MS Dhoni) ट्विटर अकाऊंटवरून (Twitter Account) ब्लू टिक हटवण्यात आली आहे.

मुंबई, 6 ऑगस्ट : टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या (MS Dhoni) ट्विटर अकाऊंटवरून (Twitter Account) ब्लू टिक हटवण्यात आली आहे. सेलिब्रिटीच्या ट्विटर अकाऊंटवरची ब्लू टिक म्हणजे त्याचं अधिकृत ट्विटर अकाऊंट असतं, पण तरीही धोनीच्या अकाऊंटवरची ब्लू टिक काढून टाकण्यात आली आहे. एमएस धोनीने बराच काळ ट्विटरचा वापर केलेला नाही, त्यामुळे ही ब्लू टिक काढल्याचं सांगितलं जात आहे.

मागच्या वर्षी 15 ऑगस्टला धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच धोनीने आपण निवृत्ती घेत असल्याचं सांगितलं होतं.

8 जानेवारी 2021 साली धोनीने अखेरचं ट्वीट केलं होतं. सुरुवातीला ट्विटरवर सक्रीय असणाऱ्या एमएस धोनीने 2018 नंतर अचानक ट्वीट करण्याची संख्या कमी केली. बहुतेकवेळा एमएस धोनीची पत्नी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते, त्यामुळे धोनी नेमकं काय करतोय याची माहिती त्याच्या चाहत्यांना कळते.

First published:
top videos

    Tags: MS Dhoni, Twitter