IPL 2019 : फॅन्स म्हणतात माही सही है...माजी क्रिकेटपटू म्हणतात धोनी तू चुकलास !

शेवटच्या षटकात असं काही घडलं की धोनीला राग अनावर झाला. धोनीचा हा अवतार पाहून त्याचे फॅनही अवाक झाले होते.

News18 Lokmat | Updated On: Apr 12, 2019 06:04 PM IST

IPL 2019 : फॅन्स म्हणतात माही सही है...माजी क्रिकेटपटू म्हणतात धोनी तू चुकलास !

जयपूर, 12 एप्रिल : राजस्थानविरुद्धच्या सामन्यात धोनीनं रायडूसोबत 95 धावांची भागीदारी केली आणि चेन्नईला सामना जिंकून दिला. पण अखेरचा षटकार काहीसा नाट्यमय ठरला.

शेवटच्या षटकात तिसरा चेंडू बेन स्टोक्सने फुलटॉस टाकला आणि पंचांचा हात नो बॉलच्या इशाऱ्याकडे गेला. मात्र स्वेअर लेगच्या पंचानी या निर्णय मागे घेतला. यामुळे मैदानाबाहेर उभा असलेला धोनी मैदानात घुसत पंचांशी भिडला. या कृतीचा जाब विचारला. शेवटच्या चेंडूत चेन्नईनं सामना जिंकला खरा पण, या धोनी टीकाचा धनी ठरला. पंचाशी गैरवर्तणुक केल्या प्रकरणी धोनीवर आयपीएलच्या वतीनं कारवाई करण्यात आली आहे. मैदानात येऊन नियम मोडल्याप्रकरणी धोनीचे ५० टक्के मानधन कापले जाणार आहे. यासंदर्भात आयपीएलकडून रात्री उशीरा एक प्रसिद्ध पत्रक जारी करण्यात आले आहे.

धोनीच्या या वादंगावर त्याच्या फॅन्सनी दुजोरा दिला असला तरी, काही माजी क्रिकेटपटूंनी मात्र त्याच्यावर टीका केली आहे.



तर, धोनीच्या काही फॅन्सनी त्याची तुलना थेट बाहुबलीशी करुन काही मिम्स तयार केले.



धोनीच्या काही चाहत्यांनी तर, IPLलाच धारेवर धरत, धोनी का रागवला याचा विचार न करता त्याला ठोठावलेला दंड म्हणजे चुकीच्या गोष्टींना समर्थन करण्यासारखं आहे, असे ट्विट केले.



दुसरीकडं धोनीच्या या वागण्यावर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन, ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मार्क वॉ, भारताचे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा व संजय मांजरेकर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. मांजरेकर यांनी, मी धोनीचा चाहता आहे, पण त्याची ही वागणुक अनपेक्षित होती.



ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मार्क वॉनं आपल्या ट्विटमध्ये, आयपीएलमधील संघ मालकांचा दबाव आणि पैसा हे मी समझू शकतो. मात्र, आयपीएलमधील दोन घटनांनी मला विचलित केले आणि या दोन्ही घटनांत आर अश्विन आणि महेंद्रसिंग धोनी हे कर्णधार आहेत. क्रिकेटसाठी ही चांगली गोष्ट नाही, असे सांगितलं.



भारताचा माजी फलंदाज आशाक चोप्राने पंचांच्या कामगिरीकडेही लक्ष वेधले. पण, त्याचवेळी त्यांनी धोनी चुकीचा पायंडा पाडत असल्याचे मत व्यक्त केले.



का भडकला धोनी?

राजस्थान आणि चेन्नई विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांनी कमाल केली. मात्र चेन्नईकडून रायडू आणि धोनी यांनी केलेली 95 धावांची भागीदारी मॅच विनिंग ठरली. दरम्यान शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी १८ धावांची आवश्यकता होती. या ओव्हरच्या या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर जडेजानं सिक्स मारला तर, दुसरा नो बॉल होता. तिसऱ्या बॉलवर मात्र बेननं धोनीची विकेट घेतली. मात्र या ओव्हरचा चौथा बॉल वादग्रस्त ठरला. मात्र उल्हास गंधे यांनी नो-बॉलचा दिलेला इशारा हा सर्वांच्या नजरेस पडला होता, तरीही पंचांनी आपला हा निर्णय मागे घेतला. नेमक्या याच मुद्द्यावर आक्षेप घेत धोनीने मैदानात येऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी धोनीच थेट मैदानात उतरला आणि अम्पायरशी भिडला. त्यामुळं हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला.



VIDEO : मोदींच्या सभेपूर्वी भाषण रोखल्यानं दिलीप गांधी भडकले, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 12, 2019 05:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close