'अंग्रेजी हम शरमिंदा है, तेरे कातिल अभी जिंदा है'; क्रिकेट बोर्डानं मृत खेळाडूबद्दल केलेलं Tweet Viral

'अंग्रेजी हम शरमिंदा है, तेरे कातिल अभी जिंदा है'; क्रिकेट बोर्डानं मृत खेळाडूबद्दल केलेलं Tweet Viral

मंजुरल इस्लाम राणा (Manjural Islam Rana) या क्रिकेरटच्या जन्मदिनानिमित्त केलं गेलेलं ट्विट (Tweet) क्रिकेट बोर्डाच्या इंग्लिशमुळे व्हायरल (Tweet Viral) होत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 04 मे : बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन केलं गेलेलं एक ट्विट सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. मंजुरल इस्लाम राणा (Manjural Islam Rana) या क्रिकेरटच्या जन्मदिनानिमित्त हे ट्विट (Tweet) केलं गेलं आहे. मंजुरल यांचा साल 2007 मध्ये एका अपघातात मृत्यू झाला आहे. मात्र, या ट्विटमध्ये लिहिलेली इंग्रजी भल्याभल्यांना लाजवणारी आहे. या कारणामुळे हे ट्विट सध्या चर्चेत असून यूझर्स याचं गांभीर्य समजून सांगत हे ट्विट डिलीट करण्याची मागणी करत आहे.

BREAKING: चेन्नई-कोलकात्यापाठोपाठ SRH आणि दिल्लीच्या 2 खेळाडूंना कोरोनाची लागण

बांगलादेश क्रिकेट बोर्डानं आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे, हॅपी बर्थडे मंजुरल इस्लाम राणा. 22 वर्ष आणि 316 दिवस, सर्वात कमी वयात निधन झालेला तरुण कसोटी क्रिकेटपटू. या ट्विटसोबतच क्रिकेटरचा एक फोटोही पोस्ट केला आहे. या ट्विटमध्ये ही एखादी मोठी कमाई असल्याप्रमाणे लिहिल्यानं क्रिकेटरच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निदान इंग्रजी तरी नीट लिहायची असा सल्लाही अनेकांनी दिला आहे.

IPL BREAKING: IPL 2021 रद्द, BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्लांची माहिती

मंजुरल राणा हे बांगलादेश क्रिकेटर होते. त्यांनी सहा टेस्ट आणि 25 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते. 16 मार्च 2007 मध्ये झालेल्या एका अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याच घटनेत त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Published by: Kiran Pharate
First published: May 4, 2021, 1:54 PM IST

ताज्या बातम्या