153 किमी वेगानं आलेल्या बाउन्सरनं मोडले फलंदाजाचे बोट, मैदानातच झाला रक्तबंबाळ

153 किमी वेगानं आलेल्या बाउन्सरनं मोडले फलंदाजाचे बोट, मैदानातच झाला रक्तबंबाळ

जीवघेणा बाउन्सरमुळे खेळाडू झाला रक्तबंबाळ, लाईव्ह सामन्यात घडला प्रकार.

  • Share this:

मेलबर्न, 28 डिसेंबर : ऑस्‍ट्रेलिया (Australia) आणि न्‍युझीलंड (New Zealand) यांच्यातील सामन्यात एका पेक्षा एक प्रसंग घडत आहेत. या सामन्यात मिशेल स्टार्कच्या 153 किमी वेगानं आलेल्या चेंडूनं चक्क फलंदाजाचे बोट मोडले. त्यामुळं न्यूझीलंडचा जलद गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या (Trent Boult) हाताला फ्रॅक्चर झाला आहे. त्यामुळं ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात बोल्टला खेळता येणार नाही आहे.

न्यूझीलंड संघाला बसलेला हा मोठा झटका होता. ट्रेंट बोल्ट फॉर्ममध्ये असतानाच त्याचा हाथ फ्रॅक्चर झाल्यामुळं त्याला सामन्याला मुकावे लागणार आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी हा प्रकार घडला. चेंडू बोटाला लागल्यानंतर काही काळ सामना थांबवण्यात आला होता. त्यानंतर बोल्ट 8 धावा करत बाद झाला.

वाचा-बॅटला न लागताच मैदानातून गायब झाला चेंडू, LIVE सामन्यात सुरू झाली शोधाशोध

न्यूझीलंड संघाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “ट्रेंट बाउल्ट दुसर्‍या कसोटीनंतर न्यूझीलंडला परत येईल. त्याचा उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे. पुनर्वसनासाठी त्याला सुमारे चार आठवडे लागतील. 'लवकरच या खेळाडूचे नाव जाहीर केले जाईल.

वाचा-CAA आणि NRC वादात पाकची उडी, क्रिकेटवरून जावेद मियाँदादनं ओकली गरळ

वाचा-VIDEO : 130 किमी वेगानं आला चेंडू, फलंदाज जमिनीवर आणि स्टम्प हवेत!

148 धावांत आटपला न्यूझीलंडचा डाव

पॅट कमिन्सचा जलद गोलंदाजानं शानदार गोलंदाजी न्यूझीलंडच्या संघाला 148 धावांवर आटपले. त्यामुळं ऑस्ट्रेलियाच्या संघाकडे आता मोठी आघाडी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 467 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडनं दिवसाच्या सुरुवातीलाच 2 विकेट गमावत 44 धावा केल्या. कमिन्सनं 5 तर जेम्य पॅटिंन्सननं 3 आणि मिशेल स्टार्कने 2विकेट घेतल्या. त्यामुळं ऑस्ट्रेलियाला 319 धावांची आघाडी मिळाली आहे. न्यूझीलंडकडून टॉम लॅथमनं 144 चेंडूत 50 धावा केल्या. आपले 16वे अर्धशतक पूर्ण करत कमिन्स बाद झाला.

वाचा-एकाच दिवसात दोन फलंदाजांच्या जीवावर बेतला चेंडू, पाहा धक्कादायक बाउन्सरचा VIDEO

लाईव्ह सामन्यात हरवला चेंडू

मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीचा सामना करताना बोल्टच्या बॅटलाही न लागला चेंडू मैदानातून गायब झाला. सामना सुरू असताना फलंदाजासह सर्वांची शोधाशोध सुरू झाला. या प्रसंगाचा मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चेंडू सापडल्यानंतर यष्टिरक्षक टिम पेन, स्टिव्ह स्मिथ स्लिपवर उभा, पॉईंटवर उभा असलेले नॅथन लिऑन यांनी बॉल वेगवेगळ्या दिशेने पाहण्यास सुरवात केली. सुरुवातीला चेंडू कोठे गेला हे कॅमेरा देखील पकडू शकला नाही. मात्र चेंडू सापडल्यानंतर सर्वच खेळाडू हसू लागले. त्याच्यासोबत फलंदाजी करणारा नील वॅग्नर हसणे थांबवू शकला नाही, तेव्हा नॅथन लायनही हसला. फलंदाजीदरम्यान बोल्टने 8 धावा केल्या आणि तो मिशेल स्टार्कचा बळी ठरला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 28, 2019 05:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading