मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

टीम इंडियाच्या क्रिकेटपटूने दिले निवृत्तीचे संकेत, म्हणाला 'नवे खेळाडू तयार'

टीम इंडियाच्या क्रिकेटपटूने दिले निवृत्तीचे संकेत, म्हणाला 'नवे खेळाडू तयार'

ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिजमध्ये हरवण्याचा पराक्रम भारताने (India vs Australia) केला. दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये नवोदितांसह टीमने ही कामगिरी केल्यामुळे या विजयाला आणखी महत्त्व प्राप्त झालं. टीम इंडियाच्या या कामगिरीनंतर फास्ट बॉलर मोहम्मद शमीने (Mohammad Shami) निवृत्तीचे संकेत दिले आहेत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 31 मार्च : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आणि इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानात टीम इंडियाने (Team India) ऐतिहासिक कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिजमध्ये हरवण्याचा पराक्रम भारताने (India vs Australia) केला. दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये नवोदितांसह टीमने ही कामगिरी केल्यामुळे या विजयाला आणखी महत्त्व प्राप्त झालं. टीम इंडियाच्या या कामगिरीनंतर फास्ट बॉलर मोहम्मद शमीने (Mohammad Shami) निवृत्तीचे संकेत दिले आहेत. जेव्हा आम्ही निवृत्त होऊ तेव्हा बदलाची प्रक्रिया सोपी असेल, असं शमी म्हणाला आहे. मोहम्मद शमी, इशांत शर्मा, (Ishant Sharma) जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि उमेश यादव (Umesh Yadav) हे टीम इंडियाचे प्रमुख 4 फास्ट बॉलर आहेत, या चौघांमउेल मागच्या काही वर्षांमध्ये टीम इंडियाने परदेशामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ब्रिस्बेनमध्ये झालेल्या टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयावेळी हे चारही खेळाडू दुखापतीमुळे टीम इंडियाबाहेर होते, तरीही टीम इंडियाने विजय मिळवला. मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) आपल्या पहिल्याच सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाला दणका दिला. तसंच दुखापतग्रस्त बॉलर्सच्या ऐवजी नेट बॉलर असलेले शार्दुल ठाकूर (Shardul Thakur), टी नटराजन (T Natrajan) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांना संधी मिळाली. या तिघांनीही त्यांना मिळालेल्या संधीचं सोनं केलं. कोपराच्या दुखापतीमुळे शमी ऍडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर झाला. 'जेव्हा आम्ही संन्यास घेऊन तेव्हा युवा खेळाडू आमची जागा घेण्यासाठी तयार असतील. ते जेवढे जास्त खेळतील, तेवढा जास्त अनुभव त्यांना मिळेल आणि ते आणखी चांगले होतील. आम्ही संन्यास घेऊ तेव्हा बदलाची प्रक्रिया फार अडचणीची नसेल,' असं शमी म्हणाला. नेट बॉलरना बायो-बबलच्या वातावरणात घेऊन गेल्यामुळे त्यांचा खूप फायदा झाला आणि त्यांना महत्त्वाच्या संधी मिळाल्या, अशी प्रतिक्रिया शमीने दिली. कार्तिग त्यागी सोडून ऑस्ट्रेलियात गेलेल्या प्रत्येक भारतीय बॉलरला खेळण्याची संधी मिळाली. कारण शमी, बुमराह आणि उमेश सीरिजदरम्यान दुखापतग्रस्त झाले, तर इशांत शर्मा दुखापतीमुळे दौऱ्यावरच गेला नाही.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket news, India vs Australia, Team india

    पुढील बातम्या