मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

BCCI: गांगुलीच्या भवितव्याचा फैसला उद्या ठरणार, सर्वोच्च न्यायालयात होणार महत्वाची सुनावणी

BCCI: गांगुलीच्या भवितव्याचा फैसला उद्या ठरणार, सर्वोच्च न्यायालयात होणार महत्वाची सुनावणी

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली

BCCI: सर्वोच्च न्यायालयात 13 सप्टेंबरला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या एका याचिकेवर सुनावणी होणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

मुंबई, 12 सप्टेंबर: सर्वोच्च न्यायालयात 13 सप्टेंबरला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या एका याचिकेवर सुनावणी होणार आहे. बीसीसीआयनं अध्यक्ष आणि सचिव पदावर असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळासंदर्भात घटना दुरुस्तीसाठी न्यायालयाची परवानगी मागितली होती. त्यावर उद्या महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या घटना दुरुस्तीनुसार बीसीसीआयनं पदाधिकाऱ्यांसाठी असणारा कूलिंग पिरियड हटवण्याची मागणी केली आहे. ज्यामुळे बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह त्यांच्या राज्य क्रिकेट संघटनेत सहा वर्ष पूर्ण केल्यानंतरही अध्यक्ष आणि सचिव पदावर कायम राहतील.

काय आहे प्रकरण?

बिहार क्रिकेट असोसिएशनमध्ये न्यायालयाच्या परवानगीशिवाय घटनेत बदल करण्यात आले. त्यावेळी या प्रकरणात मूळ याचिकाकर्ते आदित्य वर्मा यांनी सुरुवातीला हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयासमोर मांडला होता. बीसीसीआयच्या घटनेनुसार ज्याला सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे, त्यानुसार राज्य क्रिकेट असोसिएशन किंवा बीसीसीआयमध्ये तीन-तीन वर्ष एखाद्या पदावर असलेल्या व्यक्तिला तीन वर्षांचा कूलिंग पिरियड बंधनकारक आहे.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली बंगाल क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी होते. तर शाह यांनी गुजरात क्रिकेट असोसिएशनमध्ये पद भूषवलं आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी या दोघांनी सहा वर्षांपेक्षा जास्त काळ पद भूषवलं आहे. सर्वोच्च न्यायालयात कूलिंग पिरियड हटवण्याचा निर्णय झाल्यास गांगुली आणि शाह आपापल्या पदावर कायम राहतील. अन्यथा त्यांना पदावरुन पायउतार व्हावं लागेल.

हेही वाचा - T20 World Cup: रोहितनं वर्षभरापूर्वी दिलेला शब्द पाळला... 2007 ची 'ती' जोडी पुन्हा मैदानात

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या दृष्टीनं ही याचिका महत्वाची आहे. त्यावरुनच गांगुली आणि शाह यांचं भवितव्य ठरणार आहे. दरम्यान याआधी ही केस माजी सरन्यायाधीश एस. व्ही, रमण्णा यांच्या खंडपीठाकडे होती. मात्र आता न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्याकडे वर्ग करण्यात आली आहे.

First published:

Tags: BCCI, Sports