Home /News /sport /

World Cup विजेत्या ऑस्ट्रेलियन खेळाडूला व्हायचंय टीम इंडियाचं कोच!

World Cup विजेत्या ऑस्ट्रेलियन खेळाडूला व्हायचंय टीम इंडियाचं कोच!

17 ऑक्टोबरपासून सुरू होणारा टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्यासाठी अखेरचा असणार आहे.

    मुंबई, 12 ऑक्टोबर : 17 ऑक्टोबरपासून सुरू होणारा टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्यासाठी अखेरचा असणार आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर रवी शास्त्रींचा कार्यकाळ संपणार आहे. तसंच यापुढे कोच म्हणून काम करण्यासाठी आपण इच्छुक नसल्याचं रवी शास्त्रींनी बीसीसीआयला (BCCI) आधीच सांगितलं आहे. त्यामुळे आता रवी शास्त्रींनंतर टीम इंडियाचा कोच कोण होणार, याबाबत उत्सुकता आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी ऑलराऊंडर टॉम मूडी (Tom Moody) यांनी या पदासाठी इच्छा व्यक्त केली आहे. फॉक्स स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार मूडीने टीम इंडियाचा हेड कोच बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कोच होण्यासाठी मूडी अर्जही करणार आहे. 56 वर्षांचे टॉम मूडी सध्या आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट आहेत. तसंच याआधी त्यांनी श्रीलंकेच्या टीमलाही प्रशिक्षण दिलं आहे. टॉम मूडी यांना याआधीही टीम इंडियाचं प्रशिक्षक व्हायचं होतं, त्यामुळे त्यांनी 2017 आणि 2019 सालीही त्यांनी या पदासाठी अर्ज केला होता. पण अनिल कुंबळे आणि रवी शास्त्री यांनी या शर्यतीत बाजी मारली. 2013 ते 2019 मध्ये टॉम मूडी सनरायजर्स हैदराबादचे कोच होते. ते प्रशिक्षक असताना हैदराबादने 2016 साली डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. टॉम मूडी 1999 च्या वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियन टीममध्ये होते. कधी मिळणार टीम इंडियाला नवा कोच? या आठवड्याच्या अखेरीस बीसीसीआय टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकासाठीची जाहिरात प्रसिद्ध करेल, यानंतर इच्छुक या पदासाठी अर्ज करतील. यातल्या काहींची नाव शॉर्ट लिस्ट केली जातील आणि मग त्यांची मुलाखत क्रिकेट सल्लागार समिती घेईल. क्रिकेट सल्लागार समितीने नव्या प्रशिक्षकाबाबतचा प्रस्ताव दिल्यानंतर बीसीसीआय या नावाची घोषणा करेल. टी-20 वर्ल्ड कप संपल्यानंतर न्यूझीलंडची टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजला 17 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या सीरिजसाठी भारताला नवा कोच मिळेल, अशी माहिती बीसीसीआयमधल्या सूत्रांनी दिली आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ravi shastri, T20 world cup, Team india

    पुढील बातम्या