मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Tokyo Paralympics : मरियप्पन-शरदचा डबल धमाका, भारताची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

Tokyo Paralympics : मरियप्पन-शरदचा डबल धमाका, भारताची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

टोकयो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics) मंगळवारचा दिवस भारतासाठी चांगला राहिला. मरियप्पन थंगावेलुला (Mariyappan Thangavelu) पुरुषांच्या हाय जम्प T63 फायनलमध्ये सिल्व्हर मेडल मिळालं, तर याच इव्हेंटमध्ये शरद कुमारने (Sharad Kumar) ब्रॉन्झ मेडल पटकावलं.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

टोकयो, 31 ऑगस्ट : टोकयो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics) मंगळवारचा दिवस भारतासाठी चांगला राहिला. सकाळी 10 मीटर एयर पिस्टल SH1 च्या फायनलमध्ये 39 वर्षांच्या सिंहराज अधानाने (Sinharaj Adhana) भारताला ब्रॉन्झ मेडल मिळवून दिलं. यानंतर संध्याकाळी हाय जम्प इव्हेंटमध्ये भारताला आणखी दोन मेडल मिळाली. रियो पॅरालिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या मरियप्पन थंगावेलुला (Mariyappan Thangavelu) पुरुषांच्या हाय जम्प T63 फायनलमध्ये सिल्व्हर मेडल मिळालं, तर याच इव्हेंटमध्ये शरद कुमारने (Sharad Kumar) ब्रॉन्झ मेडल पटकावलं.

टोकयो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आता 10 मेडल झाली आहेत. पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासातली भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

हाय जम्प T63 फायनलमध्ये मरियप्पन थंगावेलूने 1.86 मीटर उंच उडी मारली. याचप्रकारात भारताच्या शरदने 1.83 मीटर उडी मारत ब्रॉन्झ मेडल मिळवलं. मरियप्पन आणि शरद या दोघांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात 1.73 मीटर आणि 1.77 मीटर लांब उडी मारली.

रियो ऑलिम्पिकमध्ये भारताला हाय जम्पमध्ये दोन मेडल मिळाली होती. तेव्हा मरियप्पन थंगावेलूने गोल्ड आणि वरुण सिंग भाटी याला ब्रॉन्झ मेडल मिळालं आहे. यावेळी थंगावेलूला सिल्व्हर मेडल मिळवण्यात यश आलं, पण वरुण सातव्या क्रमांकावर राहिला.

भारताची पदक संख्या 10 वर

टोकयो पॅरालिम्पिक्समध्ये भारताची पदकसंख्या 10 वर पोहोचली आहे. मंगळवारी हाय जम्पमध्ये मरियप्पन थंगावेलुला सिल्व्हर, शरद कुमारला ब्रॉन्झ, 10 मीटर एयर पिस्टल इव्हेंटमध्ये सिंहराज अधानाला ब्रॉन्झ मेडल अशी एकूण 3 मेडल मिळाली. भालाफेक स्पर्धेमध्ये भारताला 3 मेडल मिळाली. सुमित आंतिलने गोल्ड, देवेंद्र झझारियाला (Devendra Jhajharia) सिल्व्हर मेडल आणि सुंदर सिंगला (Sundar Singh) ब्रॉन्झ मेडल पटकावलं.

शूटर अवनी लेखरा (Avani Lekhara) हिला गोल्ड मेडल, डिस्कस थ्रोमध्ये योगेश कठुनियाला (Yogesh Kathuniya) सिल्व्हर मेडल, भविनाबेन पटेलला (Bhavinaben Patel) टेबल टेनिसमध्ये सिल्व्हर मेडल, आणि उंच उडीमध्ये निशाद कुमारला (Nishad Kumar)सिल्व्हर मेडल मिळालं.

टोकयो पॅरालिम्पिकमधलं भारताचं एक पदक रद्द करण्यात आलं. डिस्कस थ्रोमध्ये विनोद कुमार (Vinod Kumar) याला रविवारी ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं. विनोद कुमारचं मेडल क्लासिफिकेशन समितीने रद्दबातल केलं आहे.

First published: