मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Tokyo Paralympics मध्ये सहभागी झाले पहिले IAS अधिकारी, जिद्द पाहून सलाम कराल!

Tokyo Paralympics मध्ये सहभागी झाले पहिले IAS अधिकारी, जिद्द पाहून सलाम कराल!

 टोकियोत दिव्यांग क्रीडापटूंच्या ऑलिम्पिक्स (Tokyo Paralympics) स्पर्धा सुरू झाल्या आहेत. या स्पर्धेत देशासाठी आणखी एक सुवर्णपदक मिळवण्यासाठी सज्ज आहे एक आयएएस अधिकारी आणि पॅरा-बॅडमिंटनपटू सुहास एल. यथिराज (Suhas LY).

टोकियोत दिव्यांग क्रीडापटूंच्या ऑलिम्पिक्स (Tokyo Paralympics) स्पर्धा सुरू झाल्या आहेत. या स्पर्धेत देशासाठी आणखी एक सुवर्णपदक मिळवण्यासाठी सज्ज आहे एक आयएएस अधिकारी आणि पॅरा-बॅडमिंटनपटू सुहास एल. यथिराज (Suhas LY).

टोकियोत दिव्यांग क्रीडापटूंच्या ऑलिम्पिक्स (Tokyo Paralympics) स्पर्धा सुरू झाल्या आहेत. या स्पर्धेत देशासाठी आणखी एक सुवर्णपदक मिळवण्यासाठी सज्ज आहे एक आयएएस अधिकारी आणि पॅरा-बॅडमिंटनपटू सुहास एल. यथिराज (Suhas LY).

टोकयो, 26 ऑगस्ट : नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक्समध्ये (Tokyo Olympics 2021) भारताच्या (India) क्रीडापटूंनी ऐतिहासिक कामगिरी नोंदवून देशाची मान उंचावली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून देशासाठी पदक मिळवण्याच्या ध्येयानं झपाटलेल्या अनेक खेळाडूंची कहाणी सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरली. आता टोकियोत दिव्यांग क्रीडापटूंच्या ऑलिम्पिक्स (Tokyo Paralympics) स्पर्धा सुरू झाल्या आहेत. 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत तिरंदाजी आणि बॅडमिंटनसह सात क्रीडा स्पर्धांमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणारे 54 पॅरा-अॅथलीट 27 ऑगस्टपासून आपलं कौशल्य दाखवतील. या स्पर्धेत देशासाठी आणखी एक सुवर्णपदक मिळवण्यासाठी सज्ज आहे एक आयएएस अधिकारी आणि पॅरा-बॅडमिंटनपटू सुहास एल. यथिराज (Suhas LY). शारीरिक वैगुण्यावर मात करून अभ्यास आणि खेळ अशा दोन्ही क्षेत्रांत अव्वल कामगिरी बजावणाऱ्या सुहास एल. वाय. यांची कहाणी अतिशय प्रेरणादायी आहे. ‘तुमच्या मनाचं ऐका; कारण अपंगत्व मनात असतं,’ असा यशाचा मंत्र देणाऱ्या सुहास यांनी त्यांच्या अपंगत्वाला कधीच स्वतःच्या स्वप्नपूर्तीतला अडथळा होऊ दिलं नाही. 37 वर्षीय सुहास पुरुष एकेरी पॅरा-बॅडमिंटनमध्ये जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असून, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने (BWF) पॅरालिम्पिकसाठी निवडलेल्या चार भारतीय खेळाडूंपैकी ते असे एकमेव खेळाडू आहेत, जे देशातले प्रशासकीय उच्चाधिकारी आहेत. सुहास सध्या नोएडाचे जिल्हा दंडाधिकारी (District Magistrate) म्हणून कार्यरत आहेत. पॅरा-बॅडमिंटनपटू (Para Badminton Player) असणाऱ्या सुहास यांनी 2016मध्ये बीजिंग (Bijing) इथं झालेल्या बीडब्ल्यूएफ आशियाई पॅरा-बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. त्या वेळी सुहास उत्तर प्रदेशातल्या आझमगडचे जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम करत होते. अंतिम फेरीत त्यांनी इंडोनेशियाच्या हरि सुसानतोला हरवून सुवर्णपदक जिंकलं. फेब्रुवारी 2019 मध्ये पेरू ओपनमध्येही त्यांनी सुवर्णपदक (Gold Medal) जिंकलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करणारे आणि पदक जिंकणारे ते पहिले भारतीय प्रशासकीय अधिकारी आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी अनेक पदकं जिंकली आहेत. सुहास लालिनाकेरे यथिराज अर्थात सुहास एल. वाय. हे मूळचे कर्नाटकचे. सुहास यांचे वडील सरकारी नोकरीत होते त्यामुळे त्यांचं शिक्षण वेगवेगळ्या शहरांमध्ये झालं. माध्यमिक शिक्षण शिवमोगाच्या डीव्हीएस महाविद्यालयात झाल्यानंतर सुरतकल इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून त्यांनी 2004 मध्ये संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेत डिस्टिंक्शनसह प्रथम श्रेणी मिळवून पदवी प्राप्त केली. एक वर्ष संगणक अभियांत्रिकी (Computer Engineering) केल्यानंतर, त्यांना आपल्या आयुष्याचं हे ध्येय नाही असं वाटलं आणि त्यांनी यूपीएससी (UPSC) परीक्षेला बसण्याची तयारी सुरू केली. परीक्षेची तयारी करताना जिल्हाधिकारी होण्याचा त्यांनी विचारही केला नव्हता; मात्र नागरी प्रशासकीय सेवेत सहभागी होण्याची संधी मिळाली. 2007 उत्तर प्रदेशच्या (UP) आयएएस तुकडीचे ते अधिकारी बनले. ते देशातले पहिले स्पेशली एबल्ड म्हणजे दिव्यांग आयएएस अधिकारी आहेत. आग्रा इथून त्यांची कारकीर्द सुरू झाली. गेल्या मार्चपासून ते नोएडाचे जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांची पत्नी रितू सुहासही प्रशासकीय सेवेत असून, सध्या त्या अलाहाबादमध्ये अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. मिसेस इंडिया 2019 स्पर्धेमध्ये त्यांनी मिसेस यूपी पुरस्कार पटकावला होता. मतदार जागृतीसाठी उत्कृष्ट काम केल्याबद्दलही त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. डिसेंबर 2016 मध्ये, सुहास यांना ‘यश भारती’ हा उत्तर प्रदेशचा सर्वोच्च नागरी सन्मान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जागतिक अपंग दिनानिमित्त पॅरा-स्पोर्ट्समधल्या कामगिरीसाठी राज्य सरकारकडूनही त्यांना गौरवण्यात आलं आहे. अनेक पुरस्कारांचे धनी असलेल्या सुहास एल. वाय. यांचं एकच ध्येय आहे, ते म्हणजे देशासाठी सुवर्णपदक जिंकणं. शारीरिक मर्यादांवर मात करून प्रतिकूल स्थितीत आयएएस अधिकारी होण्याची बाजी मारणाऱ्या सुहास यांचं हे स्वप्नदेखील पूर्ण व्हावं अशी तमाम भारतीयांची अपेक्षा आहे.
First published:

पुढील बातम्या