मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Tokyo Paralympics मधून सकाळी सकाळी गोड बातमी; भाविना पटेल गोल्ड मेडलपासून अवघं एक पाऊल दूर

Tokyo Paralympics मधून सकाळी सकाळी गोड बातमी; भाविना पटेल गोल्ड मेडलपासून अवघं एक पाऊल दूर

भारताची स्टार टेबल टेनिस प्लेअर भाविना पटेलनं अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.

भारताची स्टार टेबल टेनिस प्लेअर भाविना पटेलनं अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.

Tokyo Paralympics: जपानची राजधानी टोकियो येथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेतून भारतासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

टोकियो, 28 ऑगस्ट: जपानची राजधानी टोकियो येथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेतून (Tokyo Paralympics) भारतासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. भारताची स्टार टेबल टेनिस प्लेअर (Star table tennis player) भाविना पटेलनं (Bhavina Patel) अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. भाविना पटेल आता टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक (Gold Medal) मिळवून देण्यापासून अवघं एक पाऊल दूर आहे.

सेमीफायनल (Semi final) जिंकणं भाविना पटेलसाठी सोपं आव्हान नव्हतं. कारण भाविना पटेलनं जागतिक क्रमवारीतील तिसऱ्या क्रमांकाची खेळाडू मिओचा पराभव केला आहे. अत्यंत चुरशीच्या सामन्यात भाविनानं मिओचा 3-2 (11-7, 7-11, 4-11, 11-9, 11-8) असा पराभव केला आहे. या विजयासह भाविनानं अंतिम फेरी गाठली असून टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिलं पदक निश्चित केलं आहे.

First published: