मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Tokyo Paralympics : पॅरालिम्पिकमध्ये अवनीची कमाल, गोल्डनंतर जिंकलं आणखी एक मेडल

Tokyo Paralympics : पॅरालिम्पिकमध्ये अवनीची कमाल, गोल्डनंतर जिंकलं आणखी एक मेडल

टोकयो पॅरालिम्पिकमध्ये  (Tokyo Paralympics) अवनी लखेरानं (Avani Lekhara) कमाल केली आहे. तिनं काही दिवसांपूर्वी शूटिंगमध्ये गोल्ड मेडल पटकावले होते. आता तिनं शुक्रवारी आणखी एका मेडलची कमाई केली.

  • Published by:  News18 Desk

टोकयो, 3 सप्टेंबर : टोकयो पॅरालिम्पिकमध्ये  (Tokyo Paralympics) अवनी लखेरानं (Avani Lekhara) कमाल केली आहे. तिनं काही दिवसांपूर्वी शूटिंगमध्ये गोल्ड मेडल पटकावले होते. आता तिनं शुक्रवारी ब्रॉन्झ मेडलची कमाई केली. महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन SH1 स्पर्धेतील फायनलमध्ये अवनीनं 445.9 स्कोरसह ब्रॉन्झ मेडल पटकावलं. यापूर्वी उंच उडी स्पर्धेत भारताच्या प्रवीण कुमारनं सिल्व्हर मेडल पटकावले होते. त्यापाठोपाठ अवनीनं ब्रॉन्झ मेडल जिंकल्यानं भारताच्या एकूण मेडलची संख्या 12 झाली आहे.

यापूर्वी अवनीनं 10 मीटर एअर रायफलमध्ये गोल्ड मेडल पटकावलं आहे. 19 वर्षांच्या या महिला शूटरनं 294.6 पॉईंट्सची कमाई करत गोल्ड मेडल पटकावले. पॅरालिम्पिकच्या इतिहासात भारतीय महिलेनं पटाकवलेलं हे पहिलं गोल्ड मेडल आहे.

IND vs ENG: विराटनं पुन्हा ठेवलं अश्विनला बाहेर, पत्नी प्रितीनं VIDEO मधून व्यक्त केली नाराजी

भारताची सर्वोत्तम कामगिरी

पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी भारतानं टोकयोमध्ये नोंदवली आहे. या स्पर्धेत भारतीय टीमनं आत्तापर्यंत 2 गोल्ड, 6 सिल्व्हर आणि 4 ब्रॉन्झ असे एकूण 12 मेडल पटकावले आहेत. यापूर्वी रिओमध्ये झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतानं 2 गोल्ड आणि 4 सिल्व्हर मेडलची कमाई केली होती.

First published:

Tags: Sports