Home /News /sport /

Tokyo Paralympics : नोएडाच्या DM ची ऐतिहासिक कामगिरी, पॅरालिम्पिकमध्ये पटकावले सिल्व्हर

Tokyo Paralympics : नोएडाच्या DM ची ऐतिहासिक कामगिरी, पॅरालिम्पिकमध्ये पटकावले सिल्व्हर

टोकयो पॅरालिम्पिक स्पर्धेच्या (Tokyo Paralympics 2020) शेवटच्या दिवशीही भारताची धडाकेबाज कामगिरी सुरू आहे. गौतम बुद्ध नगर (नोएडा) चे जिल्हाधिकारी असलेले सुहास यतिराज (Suhas Yathiraj) पॅरालिम्पिक स्पर्धेत मेडल जिंकणारे पहिले आयएएस अधिकारी बनले आहेत.

पुढे वाचा ...
    टोकयो, 5 सप्टेंबर : टोकयो पॅरालिम्पिक स्पर्धेच्या (Tokyo Paralympics 2020) शेवटच्या दिवशीही भारताची धडाकेबाज कामगिरी सुरू आहे. बॅडमिंटनमधील SL4 प्रकारात सुहास यतिराजने (Suhas Yathiraj) सिल्व्हर मेडलची कमाई केली आहे. फायनल मॅचमध्ये सुहास फ्रान्सच्या लुकास माजूरकडून पराभूत झाला. माजूरनं सुहासला 15-21, 21-17 आणि 21-15 नं पराभूत केलं. गौतम बुद्ध नगर (नोएडा) चे जिल्हाधिकारी असलेले सुहास पॅरालिम्पिक स्पर्धेत मेडल जिंकणारे पहिले आयएएस (IAS) अधिकारी बनले आहेत. टोकयो पॅरालिम्पिकमध्ये भारताला बॅडमिंटनमध्ये मिळालेलं हे तिसरं मेडल आहे. यापूर्वी ओडिशाच्या प्रमोद भगतनं गोल्ड मेडलची कमाई केली आहे. त्याच प्रकारात मनोज सरकारनं ब्रॉन्झ मेडलची कमाई केली आहे. भारताचे टोकयो  पॅरालिम्पिक स्पर्धेतील हे 18 वे मेडल आहे. भारताने आत्तापर्यंत 4 गोल्ड, 8 सिल्व्हर आणि 6 ब्रॉन्झ मेडल जिंकले आहेत. यामध्ये शूटींगमधील पाच तर बॅडमिंटनमधील तीन मेडलचा समावेश आहे. Tokyo Paralympics मध्ये भारताला चौथं गोल्ड, प्रमोद भगतने इतिहास घडवला सुहास यतिराजची कामगिरी कर्नाटकच्या 38 वर्षांच्या सुहासला पायाचा विकार आहे. त्यावर मात करत बॅडमिंटन कोर्टात तसंच बाहेर त्यांनी मोठं यश मिळवलंय. ते कॉम्पूटर इंजिनिअर असून 2007 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 2020 पासून ते नोएडाचे जिल्हाधिकारी असून कोरोना विरुद्धच्या लढाईत त्यांनी प्रशासनाचं नेतृत्त्व केलं आहे. यापूर्वी ते प्रयागराज, आग्रा, आझमगड, जौनपूर, सोनभद्र या जिल्ह्यातही प्रशासकिय अधिकारी म्हणून काम केलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Sports

    पुढील बातम्या