मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Tokyo Olympics : रवी दहियाचा पराभव पाहून ढसाढसा रडला तिहार जेलमधला सुशील कुमार

Tokyo Olympics : रवी दहियाचा पराभव पाहून ढसाढसा रडला तिहार जेलमधला सुशील कुमार

टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) पुरुष कुस्तीच्या 57 किलो वजनी गटामध्ये गोल्ड मेडल जिंकण्याचं भारताचं स्वप्न अपूर्ण राहिलं. रवी कुमार दहियाचा फायनलमध्ये पराभव झाला. रवीची ही कामगिरी पाहून तिहार जेलमध्ये (Tihar Jail) असलेल्या सुशील कुमारला (Sushil Kumar) रडू कोसळलं.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) पुरुष कुस्तीच्या 57 किलो वजनी गटामध्ये गोल्ड मेडल जिंकण्याचं भारताचं स्वप्न अपूर्ण राहिलं. रवी कुमार दहियाची (Ravi Kumar Dahiya) लढत रशिया ऑलिम्पिक समितीच्या (ROC) झावूर यूगऐवशी (Zavur Uguev) होती. यामध्ये रवीचा 4-7 ने पराभव झाला. भारताक़डून यापूर्वी सुशील कुमारनं (Sushil Kumar) लंडन ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये सिल्व्हर मेडल जिंकले होते. त्यानंतर नऊ वर्षांनी रवीनं ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हरची कमाई केली आहे.

सध्या तिहार जेलमध्ये असलेल्या सुशील कुमार यानेही रवी दहियाची मॅच पाहिली. रवीचा पराभव होताना पाहून सुशील कुमारला रडू कोसळलं, अशी माहिती जेलमधल्या सूत्रांनी दिली आहे. तिहार जेलच्या बराक क्रमांक 2 मध्ये असलेला सुशील कुमार दुपारपासून टीव्हीसमोर रवी कुमार दहियाची मॅच बघण्यासाठी बसला होता. तिहार जेलमधल्या खुल्या भागामध्ये सुशील कुमारसह अन्य कैद्यांना ऑलिम्पिक बघण्यासाठी टीव्ही दिला आहे.

छत्रसाल स्टेडियममध्ये रवी दहियाने सुशील कुमारकडूनच कुस्तीचे डावपेच शिकले होते. सागर धनकड हत्येप्रकरणी रोहिणी कोर्ट दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटची माहिती घेऊ शकते. सागर धनकड हत्येप्रकरणी पोलिसांनी चार्जशीटमध्ये 13 जणांना आरोपी केलं आहे, तर 15 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात 20 जण आरोपी आहेत. चार्जशीटमध्ये 13 आरोपीच असल्याचा अर्थ पोलीस अजून याप्रकरणाचा तपास करत आहेत. हा तपास सुरु असल्यामुळे पोलिसांनी कोर्टात सप्लिमेंट्री चार्जशीट दाखल केली आहे. या चार्जशीटनुसार मुख्य आरोपी सुशील कुमारसह 13 आणखी आरोपी आहेत. या सगळ्यांवर हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, आर्म्स ऍक्ट यांच्यासह गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.

First published:

Tags: Olympics 2021