Home /News /sport /

Tokyo Olympics : तिरंदाजीतील भारतीय जोडपे आऊट, पत्नी दीपिकानंतर अतनूही पराभूत

Tokyo Olympics : तिरंदाजीतील भारतीय जोडपे आऊट, पत्नी दीपिकानंतर अतनूही पराभूत

टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारताचे सर्व तिरंदाज पराभूत झाल्यानंतर दीपिका कुमारी (Deepika Kumari) आणि अतनू दास (Atanu Das) या जोडप्यावर सर्व आशा होती.

    टोकयो, 31 जुलै : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारताचे सर्व तिरंदाज पराभूत झाल्यानंतर दीपिका कुमारी (Deepika Kumari) आणि अतनू दास (Atanu Das) या जोडप्यावर सर्व आशा होती. भाराताची अव्वल तिरंदाज असलेल्या दीपिकाचा शुक्रवारी दक्षिण कोरियाच्या तिरंदाजानं सरळ सेटमध्ये पराभव केला. तर शनिवारी झालेल्या पुरुषांच्या एकेरी स्पर्धेत अतनू दासचं आव्हान प्री क्वार्टर फायनलमध्ये संपुष्टात आले. दीपिका आणि अतनू हे टोकयो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले एकमेव भारतीय जोडपे होते. या दोघांकडूनही मेडलच्या आशा होत्या. मात्र त्यांनी भारतीय फॅन्सची निराशा केली आहे. अतनूचा यजमान जपानच्या ताकाहारू फुरूकावा (Takaharu Furukawa) ने पराभव केला. पाच सेटमध्ये झालेल्या या लढतीमध्ये अतनूचा 4-6 ने पराभव केला. या विजयाबरोबर जपानच्या तिरंदाजाने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. त्यानं मेन्स इव्हेंटमध्ये यापूर्वीच मेडल जिंकले आहे. अतनूनं जपानच्या तिरंदाजाला जोरदार लढत दिली. पहिला सेट फुरूकावानं 27-25 नं जिंकला. दुसरा सेट 28-28 या बरोबरीत संपला. त्यानंतर अतनूनं तिसरा सेट 28-27 असा निसटता जिंकला. चौथा सेट पुन्हा एकदा 28-28 असा बरोबरीत सुटला. चार सेटमध्ये दोन्ही तिरंदाजांनी जोरदार खेळ केल्यामुळे सामना पाचव्या सेटपर्यंत लांबला. पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये जपानी तिरंदाजानं 27-26 अशी बाजी मारली. दीपिकानं वाढवला होता उत्साह अतनूनं यापूर्वीच्या लढतीमध्ये दक्षिण कोरियाच्या अव्वल तिरंदाजाचा शूट ऑफ मध्ये पराभव केला होता. त्यावेळी दीपिकानं प्रेक्षकांमध्ये उपस्थित राहत अतनूचा उत्साह वाढवला होता. दीपिका-अतनू या पती-पत्नीनं भारताला यापूर्वी अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवून दिले आहे. पण त्यांना ऑलिम्पिक मेडलनं पुन्हा एकदा हुलकावणी दिली. Tokyo Olympics: भारताला बॉक्सिंगमध्ये मोठा धक्का, नंबर 1 बॉक्सर पराभूत या ऑलिम्पिकमध्ये मिश्र गटातील स्पर्धेत त्यांना एकत्र खेळण्याची इच्छा होती. पण रँकिंगच्या आधारे फेडरेशनननं दीपिका आणि प्रवीण जाधव ही जोडी एकत्र उतरवली. या जोडीलाही क्वार्टर फायनल गाठण्यात अपयश आले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Olympics 2021

    पुढील बातम्या