मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Tokyo Olympics Lovlina Borgohain vs Busenaz Surmeneli: लवलीना मारणार विजयी पंच? वाचा कुठे आणि किती वाजता पाहता येणार सेमीफायनल

Tokyo Olympics Lovlina Borgohain vs Busenaz Surmeneli: लवलीना मारणार विजयी पंच? वाचा कुठे आणि किती वाजता पाहता येणार सेमीफायनल

भारतीय महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेन (Lovlina Borgohain) आणि बुसेनाझ सुरमेनेली (Busenaj Surmenelli) यांच्यातील उपांत्य फेरीचा (सेमीफायनल) सामना सकाळी 11 वाजता होणार आहे

भारतीय महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेन (Lovlina Borgohain) आणि बुसेनाझ सुरमेनेली (Busenaj Surmenelli) यांच्यातील उपांत्य फेरीचा (सेमीफायनल) सामना सकाळी 11 वाजता होणार आहे

भारतीय महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेन (Lovlina Borgohain) आणि बुसेनाझ सुरमेनेली (Busenaj Surmenelli) यांच्यातील उपांत्य फेरीचा (सेमीफायनल) सामना सकाळी 11 वाजता होणार आहे

  टोकयो, 04 ऑगस्ट: कोरोना साथीच्या प्रतिकूल परिस्थितीत सुरू असलेल्या टोकयो ऑलिम्पिक स्पर्धांचे (Tokyo Olympics 2020) विशेष महत्त्व आहे. कोरोना साथीमुळे या ऑलिम्पिकबाबत अनिश्चितता होती. गेल्या वर्षीच होणाऱ्या या स्पर्धा वर्षभर पुढं ढकलण्यात आल्या आणि अखेर जुलै 2021 मध्ये या जगप्रसिद्ध ऑलिम्पिकला सुरुवात झाली. सगळ्या जगाचे लक्ष या ऑलिम्पिकने वेधून घेतले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत आयोजित केलेल्या या स्पर्धेबाबत क्रीडारसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मोठ्या उत्साहानं क्रीडाप्रेमी घरबसल्या टीव्हीवर किंवा ऑनलाइन या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत.

  अनेक देशांप्रमाणेच भारताचे (India) क्रीडा पथकही यात सहभागी झाले आहे. अनेक नवीन खेळाडू आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी करून देशासाठी पदक मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाला पदक मिळवून देण्याची अपेक्षा ज्या खेळाडूंकडून केली जात आहे त्यापैकी एक आहे भारताची युवा बॉक्सर लवलिना बोर्गोहेन (Lovlina Borgohain). आसाममधील 23 वर्षीय लवलिना इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. तिनं एक पदक निश्चित केलं असलं तरी तिचे अंतिम लक्ष्य आहे सुवर्ण पदक मिळवण्याचे. यासाठी तिला उपांत्य फेरीत तुर्कीच्या गतविजेत्या बुसेनाझ सुरमेनेलीविरुद्ध विजय नोंदवावा लागेल. हा उपांत्य फेरीचा सामना आज (बुधवारी) होणार आहे. ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय बॉक्सर होण्याचा लवलिनाचा प्रयत्न आहे.

  हे वाचा-आणखी दोन मेडल्सकडे भारताची वाटचाल,रेसलर दीपक पुनिया आणि रवि दहिया सेमीफायनलमध्ये

  तिने यापूर्वीच विजेंदर सिंग (2008) आणि एमसी मेरी कॉम (2012) यांच्यासोबत पदक मिळवून त्यांच्याशी बरोबरी साधली आहे. आजच्या सामन्यात लवलिना जिंकली तर भारताला मिळणारे पदक हे गेल्या नऊ वर्षांतील बॉक्सिंगमधील (Boxing) भारताचे पहिले पदक असेल. उपांत्यपूर्व फेरीत चीनची माजी विश्वविजेती निन चिन चेन हिचा पराभव करून लवलिना उपांत्य फेरीत पोहोचली आहे.

  लवलिना बोर्गोहेन (Lovlina Borgohain) आणि बुसेनाझ सुरमेनेली (Busenaj Surmenelli) यांच्यातील उपांत्य फेरीचा (सेमीफायनल) सामना कधी खेळला जाईल?

  लवलिना बोर्गोहेन आणि बुसेनाझ सुरमेनेली यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना बुधवारी, 4 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजता होणार आहे.

  या सामन्याचे थेट प्रक्षेपण कोठे पाहता येईल ?

  तुम्ही सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.

  हे वाचा-Tokyo Olympics : फायनलमध्ये पराभव झाला, पण कमलप्रीतने जिंकली भारतीयांची मनं

  सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल ?

  सोनी LIV अॅप (SonyLIV) आणि Jio TV वर या सेमी फायनल सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.

  First published:

  Tags: Olympics 2021