Home /News /sport /

Tokyo Olympics : कमलप्रीत कौरनं रचला इतिहास, पहिल्याच प्रयत्नात फायनलमध्ये धडक

Tokyo Olympics : कमलप्रीत कौरनं रचला इतिहास, पहिल्याच प्रयत्नात फायनलमध्ये धडक

महिलांच्या थाळीफेक स्पर्धेत (Discuss Throw) पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणाऱ्या कमलप्रीत कौरनं (Kamalpreet Kaur) जोरदार खेळ करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

    टोकयो, 31 जुलै : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) शनिवारी भारतीय तिरंदाज आणि बॉक्सरनं खराब सुरुवात केली.  तिरंदाजीमध्ये अतून दास (Atanau Das) तर बॉक्सिंगमध्ये अमित पंघाल (Amit Panghal) यांचे आव्हान संपुष्टात आले. त्यानंतर महिलांच्या थाळीफेक स्पर्धेत (Discuss Throw) भारतासाठी संमिश्र दिवस ठरला. पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणाऱ्या कमलप्रीत कौरनं (Kamalpreet Kaur) जोरदार खेळ करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्याचवेळी अनुभवी खेळाडू सीमा पुनियाचं (Seema Puniya) आव्हान संपुष्टात आलं आहे. कमलप्रीतनं पहिल्या प्रयत्नात 60. 29 मीटर थ्रो केला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 63.97 आणि तिसऱ्या प्रयत्नात 64 मीटर लांब थाळी फेकत फायनलमध्ये प्रवेश केला. सीमा यावेळी अपयशी ठरली. सीमला 60.57 मीटरपर्यंतच थाळी फेकता आली. कमलप्रीत दुसरी कमलप्रीतनं दुसऱ्या क्रमांकासह फायनलमध्ये प्रवेश केला आहे. अमेरिकेच्या वालारी अलमॅननं 64.42 मीटर लाबं थाळी फेकत पहिला क्रमांक पटकावला. कमलप्रीत आणि वालरी या दोघींचाही ग्रुप बी मध्ये समावेश होता. ग्रुप ए मधील एकाही खेळाडूला 64 मीटरचा पल्ला गाठता आला नाही. Tokyo Olympics : कंडोममुळे जिंकलं ऑलिम्पिक मेडल! हे कसं घडलं, पाहा VIDEO ग्रुप ए मध्ये समावेश असलेल्या सीमा पुनियाचा पहिला प्रयत्न अवैध ठरला. तिनं दुसऱ्या प्रयत्नात 60.57 तर तिसऱ्या प्रयत्नात 58.93 मीटर लांब थ्रो केला.  आता फायनलमध्ये अंतिम 12 खेळाडूंची लढत 2 ऑगस्ट रोजी होणार आहे. एथलेटिक्समध्ये भारताला आजवर एकही ऑलिम्पिक मेडल मिळालेलं नाही. कमलप्रीत ऐतिहासिक कामगिरी करणार का? हे सोमवारी स्पष्ट होईल. भारताला भालाफेकीत नीरज चोप्राकडूनही अपेक्षा आहे. त्याच्या खेळातील स्पर्धा 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Olympics 2021

    पुढील बातम्या