मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Tokyo Olympics 2020 : हॉकीमध्ये भारताचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाकडून 7-1 ने धुलाई

Tokyo Olympics 2020 : हॉकीमध्ये भारताचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाकडून 7-1 ने धुलाई

न्यूझीलंडविरुद्ध विजयी सुरुवात करणाऱ्या भारतीय हॉकी टीमचा (Indian Hockey Team) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात लाजिरवाणा पराभव झाला आहे. टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) ऑस्ट्रेलियने भारताला (India vs Australia) या मॅचमध्ये 7-1 ने मात दिली.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 25 जुलै : न्यूझीलंडविरुद्ध विजयी सुरुवात करणाऱ्या भारतीय हॉकी टीमचा (Indian Hockey Team) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात लाजिरवाणा पराभव झाला आहे. टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) ऑस्ट्रेलियने भारताला (India vs Australia) या मॅचमध्ये 7-1 ने मात दिली. पहिल्याच हाफमध्ये कांगारूंनी 4-0 ने बढत घेतली आणि सामन्यातला आपला विजय जवळपास निश्चित केला. दुसऱ्या हाफमध्ये भारतीय खेळाडूंनी थोडा दम दाखवला, पण ऑस्ट्रेलियासारख्या बड्या टीमविरुद्ध सुरुवातीलाच एवढ्या पिछाडीवर असल्यामुळे त्यांना पुनरागमन करता आलं नाही. भारतीय खेळाडूंनी घातलेल्या गोंधळाचा फायदा ऑस्ट्रेलियालाही मिळाला.

ऑस्ट्रेलियाकडून डेनियल बील, जेरेमी हेवार्ड, फ्लिन ओगलिवी, जोशुआ बेल्टज, ब्लॅक गोवर्स आणि टीम ब्रांड यांनी गोल केले. तर भारताकडून दिलप्रीत सिंगने 34 व्या मिनिटाला एकमेव गोल केला. भारताचा पुढचा सामना 27 जुलैला स्पेनविरुद्ध (India vs Spain) होणार आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. पहिल्या हाफमध्ये त्यांनी 11 शॉट गोलवर मारले, यातले 4 गोल झाले. दुसरीकडे भारताने 3 शॉट गोलवर मारले, यातल्या एकही वेळा भारताला गोल करता आला नाही.

First published:

Tags: India vs Australia, Olympics 2021