मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Tokyo Olympic वर नवीन संकट, शहरामध्ये आणीबाणीची घोषणा

Tokyo Olympic वर नवीन संकट, शहरामध्ये आणीबाणीची घोषणा

ऑलिम्पिक खेळांचा (Tokyo Olympics) अनुभव घेण्याची चाहत्यांची इच्छा अधुरीच राहण्याची शक्यता आहे. कारण जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी टोकयोमध्ये वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांमुळे (Corona Virus) आणीबाणी लावली आहे.

  • Published by:  Shreyas

टोकयो, 8 जुलै : ऑलिम्पिक खेळांचा (Tokyo Olympics) अनुभव घेण्याची चाहत्यांची इच्छा अधुरीच राहण्याची शक्यता आहे. कारण जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी टोकयोमध्ये वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांमुळे (Corona Virus) आणीबाणी लावली आहे. यामुळे टोकयो ऑलिम्पिकमध्ये प्रेक्षकांच्या सहभागावर बंदी घालण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (IOC) अध्यक्ष थॉमस बाक गुरुवारी टोकयोमध्ये पोहोचले तेव्हाच ही घोषणा करण्यात आली आहे.

सोमवारपासून आणीबाणी लागू होईल आणि 22 ऑगस्टपर्यंत कायम राहिल. म्हणजेच 23 जुलै ते 8 ऑगस्टपर्यंत होणारं ऑलिम्पिकचं आयोजन पूर्णपणे आणीबाणीच्या काळात होणार आहे. 'देशात भविष्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू नये, म्हणून आणीबाणी लागू करावी लागली,' असं पंतप्रधान म्हणाले. ऑलिम्पिक खेळाचं आयोजन मागच्या वर्षी होणार होतं, पण कोरोनामुळेच स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आली.

टोकयोमध्ये पोहोचल्यानंतर ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक आयओसी मुख्यालयात पोहोचले. शहराच्या मध्यवर्ती भागात फाईव स्टार हॉटेलमध्ये हे मुख्यालय बनवण्यात आलं आहे. बाक यांना तीन दिवस आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. आयओसी आणि स्थानिक आयोजक कोरोनाच्या काळातही स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी आग्रही आहेत.

आणीबाणीच्या स्थितीमध्ये मद्यविक्री करणारे बार आणि हॉटेल बंद करण्याचं आवाहन केलं जात आहे. ऑलिम्पिकमधली गर्दी टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्याची मागणी केली जात आहे. एवढच नाही तर टोकयोतल्या नागरिकांना घरात बसून टीव्हीवरच सामने बघावे, असं सांगण्यात येऊ शकतं. 'नागरिकांना घरात बसून ऑलिम्पिकचा आनंद घेताना, दारू पिण्यासाठी बाहेर जाण्यापासून कसं रोखता येईल, हा महत्त्वाचा मुद्दा आहे,' असं आरोग्यमंत्री नोरिहिसा तामुरा म्हणाले.

First published:

Tags: Olympics 2021