टोकयो, 30 जुलै : नोवाक जोकोविचचं (Novak Djokovic) गोल्डन ग्रॅण्डस्लॅमचं स्वप्न भंगलं आहे. सर्बियाच्या नोवाक जोकोविचचा पराभव हा टोकयो ऑलिम्पिकमधला (Tokyo Olympics 2020) सगळ्यात मोठा उलटफेट असल्याचं मानलं जात आहे. जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेव (Alexander Zverev) याने जोकोविचचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. याचसोबत जोकोविचचं गोल्ड मेडल जिंकण्याचं स्वप्न भंगलं, आता जोकोविच ब्रॉन्झ मेडलच्या मुकाबल्यासाठी मैदानात उतरेल.
नोवाक जोकोविचने 2021 साली ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बलडनचा किताब जिंकला, यानंतर त्याच्याकडे ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकत गोल्डन ग्रॅण्डस्लॅमचं (Golden Grand Slam) स्वप्न पूर्ण करण्याची संधी जोकोविचकडे होती. आतापर्यंत कोणत्याही पुरुष टेनिसपटूला असा विक्रम करता आलेला नाही.
ऑलिम्पिकमध्ये जर जोकोविचला गोल्ड मेडल मिळालं असतं, तरीही त्याला युएस ओपन जिंकावं लागलं असतं. एखादा टेनिसपटू जर एकाच वर्षात चार ग्रॅण्डस्लॅम आणि ऑलिम्पिंक गोल्ड मेडल जिंकला, तर त्याला गोल्डन ग्रॅण्डस्लॅम किंवा गोल्डन स्लॅम असं म्हणलं जातं. अशी कामगिरी फक्त जर्मनीच्या स्टेफी ग्राफला करता आली आहे.
नोवाक जोकोविच सध्या जगातला पहिल्या क्रमांकाचा टेनिसपटू आहे. त्यामुळे त्याला अलेक्झांडर ज्वेरेवविरुद्ध विजयाचा प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण जर्मनीच्या ज्वेरेवने जोकोविचचा 6-1, 3-6, 6-1 असा पराभव केला. हा मुकाबला जिंकण्यासाठी त्याला 2 तास आणि 3 मिनीटं लागली.
ज्वेरेवचा जोकोविचविरुद्ध 9 सामन्यांमधला हा तिसरा विजय होता. आता फायनलमध्ये त्याचा मुकाबला रशियाच्या कॅरेन खाचानोवविरुद्ध होणार आहे. खाचानोवने सेमी फायनलमध्ये स्पेनच्या पाब्लो कॅरेनो बुस्टाचा 6-3, 6-3 असा पराभव केला. आता पाब्लो आणि जोकोविच यांच्यात ब्रॉन्झ मेडलसाठी सामना होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Olympics 2021, Tennis player