मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Tokyo Olympics : खेळाडूंना मिळणार 1,60,000 कंडोम! पण वापरता येणार नाहीत, कारण...

Tokyo Olympics : खेळाडूंना मिळणार 1,60,000 कंडोम! पण वापरता येणार नाहीत, कारण...

23 जुलैपासून टोकयो ऑलिम्पिकला (Tokyo Olympics) सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत जगभरातल्या सगळ्या खेळाडूंना प्रत्येकी 14 कंडोम (Condoms) देण्यात येणार आहेत.

टोकयो, 8 जून : 23 जुलैपासून टोकयो ऑलिम्पिकला (Tokyo Olympics) सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत जगभरातल्या सगळ्या खेळाडूंना प्रत्येकी 14 कंडोम (Condoms) देण्यात येणार आहेत. जपानमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत खेळाडूंना एकूण 1,60,000 कंडोम देण्यात येतील, पण त्यांनी कंडोम वापरू नयेत, असं आयोजकांनी सांगितलं आहे. खेळाडू स्पर्धेवेळी हे कंडोम वापरण्यापेक्षा त्यांच्या घरी घेऊन जातील, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. खेळाडूंनाही हे निर्बंध मान्य करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.

1988 सालच्या सियोल ऑलिम्पिकपासून अशाप्रकारे कंडोमचं वाटप केलं जातं. एड्सविरोधी (HIV AIDS) जनजागृती करण्यासाठी खेळाडूंना अशाप्रकारे कंडोम दिले जातात.

'खेळाडूंनी ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये कंडोम वापरू नयेत, त्यापेक्षा स्वत:च्या देशात जाऊन एड्सबद्दल जनजागृती करावी,' असं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने सांगितलं आहे.

कोरोनाच्या संकटामुळे खेळाडूंना ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागणार आहे, यामध्ये दोन व्यक्ती एकमेकांपासून दोन मीटरचं अंतर ठेवतील, तसंच खेळाडूंना कोणालाही स्पर्शही करता येणार नाही. सामन्यादरम्यानही खेळाडूंना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना, सहकाऱ्यांना तसंच मॅच अधिकाऱ्यांसोबत हस्तांदोलनही करता येणार नाही. कोणत्याही खेळाडूने हा नियम मोडला तर त्याला मोठा दंड करण्यात येणार आहे.

First published:

Tags: Olympic, Olympics 2021