टोकयो, 22 जुलै: संपूर्ण क्रीडा विश्वाचं लक्ष लागलेली टोकयो ऑलिम्पिक स्पर्धा (Tokyo Olympics 2021) सुरू होण्यास काही तासांचाच कालावधी उरला आहे. जपानच्या राजधानीमध्ये शुक्रवारी या स्पर्धेचा उद्घाटन कार्यक्रम (Opening Ceremony) होईल. या कार्यक्रमाची सर्व तयारी आता पूर्ण झाली आहे. यजमान देशानं या स्पर्धेची जय्यत तयारी केली आहे. मात्र या स्पर्धेवर कोरोनाचं सावट कायम आहे.
भारताचे फक्त 30 खेळाडू या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. कोरोनाच्या भीतीनं हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या भारतीय खेळाडूंचे सामने शनिवारी होणार आहेत, त्या टीममधील खेळाडू या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत.
तिरंदाजी, ज्यूडो, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग, टेनिस, हॉकी (पुरुष आणि महिला) , शूटींग या सात खेळातील खेळाडूंना शनिवारी सामना खेळायचा आहे. त्यामुळे या खेळाडूंना खबरदारीचा उद्घाटन कार्यक्रमात सहभागी न होण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष नरेंदर बत्रा यांनी दिली आहे.
भारतीय पथकातील फक्त 6 अधिकारीच या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिन राजीव मेहता यांनी यापूर्वीच दिली आहे. 'खेळाडूंना त्रास होईल किंवा धोका निर्माण होईल अशी सर्व परिस्थिती टाळण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे उद्घाटन कार्यक्रमातील भारतीय पथकाची संख्या मर्यादीत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे,' असे मेहता यांनी सांगितले. उद्घाटन कार्यक्रम रात्री उशीरापर्यंत चालण्याची शक्यका आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू फ्रेश रहावे, असा आमचा प्रयत्न आहे, असे असोसिएशनं स्पष्ट केलं आहे.
आणखी एकाला दुखापत, टीम इंडियाचा तिसरा खेळाडू इंग्लंड दौऱ्यातून बाहेर
जपानी बाराखडीप्रमाणे उद्घाटन कार्यक्रमातील पथसंचलनात सर्व देशांच्या टीम सहभागी होतील. यामध्ये भारतीय पथकाचा क्रमांक 21 वा आहे. भारतीय ऑलिम्पिक पथकात यंदा 124 खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये 69 पुरुष तर 55 महिला आहेत. एकूण 85 गोल्ड मेडलसाठी भारतीय खेळाडू त्यांची दावेदारी या स्पर्धेत सादर करणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, India, Olympics 2021