• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • Tokyo Olympic: Anti Sex Bed पाहून खेळाडू नाराज, फोटो शेअर करत म्हणाला...

Tokyo Olympic: Anti Sex Bed पाहून खेळाडू नाराज, फोटो शेअर करत म्हणाला...

टोक्यो ऑलिम्पिक (Tokyo Olympic 2021) व्हिलेजमधील बेड पाहून (Anti Sex Bed) खेळाडू नाराज झाले आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेच्या दरम्यान सेक्स कसा करणार? असा प्रश्न खेळाडूंनी विचारला आहे.

 • Share this:
  टोक्यो, 18 जुलै: टोक्यो ऑलिम्पिकचं (Tokyo Olympic 2021) काऊंटडाऊन आता सुरू झालं आहे. जगभरातील खेळाडू या स्पर्धेसाठी जपानमध्ये दाखल होत आहेत. या स्पर्धेत पात्र होण्यासाठी त्यांनी कठोर सराव केला आहे. या सरावाची परीक्षा आता काही दिवसांनी सुरू होणार आहे. या ऑलिम्पिकवर कोरोना व्हायरसचं (coronavirus) सावट आहे. त्यातच ऑलिम्पिक व्हिलेजमधील व्यवस्था पाहून खेळाडू नाराज झाले आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेच्या दरम्यान सेक्स कसा करणार? असा प्रश्न खेळाडूंनी विचारला आहे. काय आहे प्रकरण? ऑलिम्पिक स्पर्धा ही मैदानातील रेकॉर्डमुळे दरवर्षी गाजते. त्याचबरोबर या स्पर्धेच्या काळात खेळाडू मोठ्या प्रमाणात सेक्स देखील करतात. आयोजन समितीनं  या स्पर्धेच्या दरम्यान 1 लाख 60 हजार कंडोमचे वाटप करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे, असे वृत्त काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाले होते. खेळाडूंमध्ये सोशल डिस्टन्सिंग (social distancing) आवश्यक असताना कंडोम वाटप का होत आहे? असा प्रश्न उपस्थित झाला होता. हा वाद ताजा असतानाच आता अँटी सेक्स बेडचा (Anti Sex Bed) नवा वाद निर्माण झाला आहे. काय आहे Anti Sex Bed? या ऑलिम्पिक स्पर्धेच्या कालखंडात खेळाडू ज्या बेडवर झोपणार आहेत तो बेड अँटी सेक्स बेड म्हणून प्रसिद्ध झाला आहे. याचे कारण म्हणजे या बेडवर खेळाडू त्यांची इच्छा असली तरी रोमान्स करु शकणार नाहीत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आयोजकांनी जे उपाय केले आहेत. त्यामध्ये या बेडचा समावेश आहे. कशी आहे बेडची रचना? यावेळी खेळाडूंना देण्यात आलेले बेड कार्डबोर्डने बनवण्यात आले आहेत. ते बेड फक्त एकाच व्यक्तीचे वजन पेलू शकेल. दोन व्यक्ती या बेडवर झोपल्या तर तो बेड मोडू शकतो. हा बेड कोणत्याही प्रकारचे झटके सहन करू शकणार नाही. त्याचबरोबर या बेडवर थोडा जरी जास्त दबाव पडला तर तो तुटेल. या बेडची रचना पाहून खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. रियो ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकलेला अमेरिकेचा खेळाडू पॉल चेलिमो (Paul Chelimo) याने या बेडचा फोटो ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकारच्या बेडवर रात्री नीट झोप लागणार नाही. रात्री झोप झाली नाही तर चांगली कामगिरी कशी करणार? असा प्रश्न खेळाडूंनी विचारला आहे. ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये कंडोम वाटण्याची प्रथा ही जुनीच आहे. HIV चा धोका टाळण्यासाठी सर्व हा उपा. केला जातो. मात्र यंदाची ऑलिम्पिक समिती या विषयावर चांगलीच वादग्रस्त ठरली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: