टोकयो, 5 ऑगस्ट : संपूर्ण देशाचं गुरुवारी लक्ष हे रवी कुमार दहीया (Ravi Kumar Dahiya) या कुस्तीपटूकडं आहे. रवी कुमार गुरुवारी 57 किलो वजनी गटातील फायनलमध्ये खेळणार आहे. ऑलिम्पिक इतिहासात कुस्तीमध्ये फायनल गाठणारा रवी कुमार हा दुसरा भारतीय मल्ल आहे. यापूर्वी सुशील कुमारनं लंडनमध्ये 2012 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सिल्व्हर मेडल जिंकले होते. यंदा रवीला गोल्ड मेडल जिंकण्याची संधी आहे.
रवी कुमारच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे त्याच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. तो गोल्ड मेडल जिंकूनच परत येईल असा विश्वास त्याच्या आईनं व्यक्त केलाय. रवी घरी परतल्यानंतर त्याच्या आवडीची खीर आणि चूरमा देऊन त्याचं स्वागत करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
'रवी गोल्ड मेडल जिंकून परत येईल त्यावेळी त्याचे भव्य स्वागत करण्यात येईल. तो सेमी फायनलमध्ये खेळत असताना एकाक्षणी हरला असं मला वाटलं होतं, त्यामुळे मी रडू लागले. पण रवीनं शेवटपर्यंत हार मानली नाही. त्यानं ती मॅच जिंकत देशासाठी मेडल पक्कं केलं, ' असं त्याच्या आईनं सांगितलं.
दिवाळीला घरी आला नाही!
रवी कुमारला कुस्तीचा ध्यास आहे. तो दिवाळीला देखील घरी आला नाही. ऑलिम्पिकच्या तयारीसाठी दिल्लीहून रशियाला गेला. तिथं अभ्यास करुन टोकयोमध्ये पोहचला. ऑलिम्पिक पदक घेऊनच गावी परत येणार हा शब्द रवीनं पूर्ण केला आहे, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे.
Tokyo Olympics 2020: भारताचे 5 हीरो, ज्यांनी घडवला 41 वर्षांनंतर इतिहास
रवीनं सेमी फायनलमध्ये कझाकस्तानच्या कझाकस्तानच्या नूरइस्लाम सानायेवाचा पराभव केला. रवीनं सेमी फायनलमध्ये जिगरबाज खेळ करत पराभवाच्या तोंडातून विजय खेचून आणला आणि भारताचे आणखी एक मेडल नक्की केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Olympics 2021