मुंबई, 6 ऑगस्ट : भारतीय महिला हॉकी टीम (India Women Hockey Team) टोकयो ऑलिम्पिकमध्ये पदकापासून दूर राहिली. पण, त्यांनी दमदार कामगिरी करत सर्वांची मन जिंकली. रिओ ऑलिम्पिकमध्ये शेवटच्या क्रमांकावर असलेली भारतीय टीम शेवटच्या मिनिटापर्यंत ब्रॉन्झ मेडलच्या शर्यतीमध्ये होती. अखेर ब्रिटननं त्यांचा 4-3 नं पराभव करत ब्रॉन्झ मेडल पटकावले.
भारतीय महिला टीमच्या या कामगिरीबद्दल खेळाडूंचं कौतुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी टोकयोमध्ये खेळाडूंना फोन केला होता. 'पदक मिळालं नाही, पण तुमच्या घामानं देशातील कोट्यावधी मुलींना प्रेरणा मिळाली आहे. मी टीममधील सर्व खेळाडू आणि तुमच्या कोचचं अभिनंदन करतो.' या शब्दात मोदींनी खेळाडूंचं कौतुक केलं.
पंतप्रधान मोदींनी यावेळी नवनीत कौरच्या दुखापतीची ही चौकशी केली. नवनीतच्या डोळ्याला चार टाके पडले असल्याची माहिती खेळाडूंनी मोदींना दिली. 'तुम्ही निराश होऊ नका. देशाला तुमचा अभिमान आहे. तुमच्या कष्टामुळेच देशात हॉकीला नवी ओळख मिळाली आहे.' असे मोदींनी यावेळी सांगितले.
#WATCH | Indian Women's hockey team breaks down during telephonic conversation with Prime Minister Narendra Modi. He appreciates them for their performance at #Tokyo2020 pic.twitter.com/n2eWP9Omzj
— ANI (@ANI) August 6, 2021
मोदींशी फोनवर बोलताना काही खेळाडूंना अश्रू अनावर झाले. त्यावेळी पंतप्रधानांनी सर्वांना धीर दिला. टोकयो ऑलिम्पिकमधील महिला हॉकी टीमचं प्रदर्शन लोकं नेहमी लक्षात ठेवतील. तुम्ही सर्वोत्तम खेळ केला आहे. टीमच्या प्रत्येक सदस्यानं साहस, कौशल्य आणि दृढनिश्यचाचं प्रदर्शन केलं, असं मोदींनी यावेळी म्हणाले. महिला टीमच्या कोचचे देखील मोदींनी यावेळी आभार मानले.
भारतीय महिला टीमची ही तिसरीच ऑलिम्पिक स्पर्धा होती. 2016 साली ही टीम 12 व्या नंबरवर होती. त्यापूर्वी 1980 साली भारतीय टीमनं चौथा क्रमांक पटकावला होता. मात्र त्यावेळी सेमी फायनलच्या लढती नव्हत्या. त्यामुळे भारतीय महिलांचे ऑलिम्पिक इतिहासातील हे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Olympics 2021