मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

EXPLAINER : सिल्व्हर मेडलपेक्षा ब्रॉन्झ मेडल जिंकणारे खेळाडू जास्त आनंदी का असतात?

EXPLAINER : सिल्व्हर मेडलपेक्षा ब्रॉन्झ मेडल जिंकणारे खेळाडू जास्त आनंदी का असतात?

सिल्व्हर मेडल जिंकलेल्या खेळाडू

सिल्व्हर मेडल जिंकलेल्या खेळाडू

सध्या जपानची राजधानी (Japan) टोकियो येथे ऑलिम्पिक (Tokyo Olympic 2020) स्पर्धा सुरू आहेत. त्यामुळे एकूणच खेळ आणि पदकांच्या कमाईची चर्चा सर्वत्र पाहायला मिळते. ऑलिम्पिकमध्ये पदकांच्या संख्येच्या आधारे प्रत्येक देशाची या स्पर्धेतली कामगिरी स्पष्ट होत असते.

पुढे वाचा ...

टोकयो, 6 ऑगस्ट : सध्या जपानची राजधानी (Japan) टोकियो येथे ऑलिम्पिक (Tokyo Olympic 2020) स्पर्धा सुरू आहेत. त्यामुळे एकूणच खेळ आणि पदकांच्या कमाईची चर्चा सर्वत्र पाहायला मिळते. ऑलिम्पिकमध्ये पदकांच्या संख्येच्या आधारे प्रत्येक देशाची या स्पर्धेतली कामगिरी स्पष्ट होत असते. कोणत्याही क्रीडा प्रकारात सर्वोच्च रॅंक मिळवणाऱ्या खेळाडूला गोल्ड मेडल (Gold Medal), द्वितीय क्रमांकावरच्या खेळाडूला सिल्व्हर मेडल (Silver Medal) तर तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला ब्रॉन्झ मेडलने (Bronze Medal) गौरवलं जातं. गोल्ड मेडल मिळाल्यानंतर खेळाडूंना निश्चितच प्रचंड आनंद होतो; मात्र सिल्व्हर मेडल विजेत्यांपेक्षा ब्रॉन्झ मेडल विजेत्यांना अधिक आनंद होतो, असं आढळून आलं आहे. यामागे मानसशास्त्रीय कारण आहे.

जेव्हा खेळाडूंना पदक देऊन गौरविण्यात येतं, त्या वेळी अनेकदा असं दिसून आलं आहे, की ब्रॉन्झ मेडल विजेता खेळाडू सिल्व्हर मेडल विजेत्या खेळाडूच्या तुलनेत अधिक आनंदी (Happy) असतो. कारण ब्रॉन्झ मेडल विजेता खेळाडू सामन्यापूर्वी 'मला फक्त मेडल जिंकायचं आहे,' असा विचार करत असतो. त्याच्या मनात फक्त मेडल जिंकणं हा एकमेव उद्देश असतो आणि सामन्यात तो ब्रॉन्झ मेडल जिंकतो. मेडल जिंकणं हा त्याचा उद्देश सफल झाल्याने तो खूप समाधानी आणि आनंदी असतो; मात्र सिल्व्हर मेडल जिंकणाऱ्या खेळाडूंच्या बाबतीत असं नसतं. कारण गोल्ड मेडल मिळवण्यात यश न मिळाल्याने सिल्व्हर मेडल मिळत असतं. म्हणजेच गोल्ड मेडलचं उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने एका अर्थाने त्याच्या मनात पराभवाची भावना निर्माण होते. त्यामुळे तो काही प्रमाणात दुःखी होतो. त्यामुळेच सिल्व्हर मेडल विजेत्याच्या तुलनेत ब्रॉन्झ मेडल विजेता अधिक आनंदी असल्याचं पाहायला मिळतं.

अनेक मानसशास्त्रज्ञांचंही असंच मत आहे, की ब्रॉन्झ मेडल विजेता खेळाडू अधिक आनंदी असतो. सायंटिफिक अमेरिकन नावाच्या एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, कोर्नेल युनिव्हर्सिटीतले मानसशास्त्रज्ञ व्हिक्टोरिया मेडव्हॉक आणि थॉमस ग्लोव्हिच, तसंच टोरांटो युनिव्हर्सिटीतले स्कॉट मॅडी म्हणतात, की ही बाब काउंटर फॅक्चुअल थिंकिंगच्या आधारे स्पष्ट होते. त्यानुसार ब्रॉन्झ मेडल विजेता खेळाडू अधिक आनंदी का असतो, हे जाणून घेता येऊ शकतं.

जेव्हा एखादा खेळाडू गोल्ड मिळवण्यासाठी खेळतो, पण त्यात यशस्वी न झाल्याने त्याला सिल्व्हर मेडल मिळतं. काउंटर फॅक्चुअल थिंकिंगनुसार (CounterFactual Thinking) विचार केला, तर सिल्व्हर मेडल जिंकलेला खेळाडू आपल्याला गोल्ड मेडल मिळावं, आपण पहिल्या स्थानावर यावं यासाठी कठोर परिश्रम घेतो. परंतु, जेव्हा त्याचा उद्देश साध्य होत नाही, तेव्हा तो खूप निराश होतो. काही वेळापूर्वी गोल्ड मेडल जिंकण्याची अपेक्षा असलेल्या खेळाडूला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावं लागतं. गोल्ड मेडल मिळण्याच्या अगदी काही क्षण अगोदर तो पराभूत होतो, यामुळे त्याचं स्वप्न भंगतं आणि तो निराश होतो.

First published:

Tags: Olympics 2021