मुंबई, 7 ऑगस्ट : नीरज चोप्राने (Neeraj Chopra) टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) ऐतिहासिक कामगिरी करत गोल्ड मेडल पटकावलं. भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये (Men's javelin throw) नीरज चोप्राने ही गोल्डन कामगिरी केली. टोकयो ऑलिम्पिकमधलं हे भारताचं पहिलंच गोल्ड मेडल आहे. तसंच ऑलिम्पिक इतिहासातलं एथलिटिक्समधलं हे भारताचं पहिलंच गोल्ड मेडल ठरलं. नीरज चोप्राच्या या कामगिरीमुळे भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकरही (Sunil Gavaskar) खूश झाले. एवढच नाही तर त्यांनी कॉमेंट्री सुरू असताना भांगडाही केला.
भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या पहिल्या टेस्टमध्ये सुनिल गावसकर कॉमेंट्री करत आहेत. नीरज चोप्राने गोल्ड मेडल पटकवल्याचं समजताच गावसकर आनंदी झाले आणि त्यांनी ‘मेरे देश की धरती सोना उगले’या गाण्यावर भांगडा केला. ऑलिम्पिक आणि टेस्ट सीरिजचं प्रसारण करणाऱ्या सोनी टेन-3 ने हा क्षण खास प्रेक्षकांसाठी दाखवला. तसंच गावसकरांनी कॉमेंट्री करत असताना जिलेबीही खाल्ली.
Sunil Gavaskar Ji singing "Mere desh ki dharti sona ugle" 🔥🔥 Proud 🇮🇳 Goosebumps#NeerajChopra pic.twitter.com/4lZ6uIlz2V
— Goat lover Abdul (@Abhishekkkk10) August 7, 2021
नीरज चोप्राच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याला क्रिकेटपटूंनीही शुभेच्छा दिल्या. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण, वसीम जाफर, गौतम गंभीर या क्रिकेटपटूंनी नीरजचं अभिनंदन केलं. नीरजने भाला सूर्यापर्यंत पोहोचवला, अशी प्रतिक्रिया सचिन तेंडुलकरने दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.