• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • Tokyo Olympics : भारताची 'चक दे' कामगिरी, कबीर खानच्या ट्वीटवर खऱ्या कोचची भन्नाट रिएक्शन

Tokyo Olympics : भारताची 'चक दे' कामगिरी, कबीर खानच्या ट्वीटवर खऱ्या कोचची भन्नाट रिएक्शन

भारताच्या विजयानंतर अनेकांनी टीमचे कोच शोर्ड मारीने (Sjoerd Marijne) यांनी चक दे इंडिया सिनेमातील कोच कबीर खानला (Kabir Khan) भन्नाट उत्तर दिलं आहे.

 • Share this:
  टोकयो, 2 जुलै : भारतीय  महिला हॉकी टीमनं (Indian Women's Hockey Team) टोकयो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympics) सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. या टीमनं क्वार्टर फायनलमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 1-0 नं पराभव केला. भारतीय महिलांच्या या विजयानंतर अनेकांना शाहरुख खान (Shah Rukh Khan) याची मुख्य भूमिका असलेल्या चक दे! इंडिया (Chak De! India)  या सिनेमाची आठवण झाली. या सिनेमातही भारतीय टीमनं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत विजेतेपद पटकावले होते. भारताच्या विजयानंतर अनेकांनी टीमचे कोच शोर्ड मरीने (Sjoerd Marijne) आणि चक दे इंडियामधील महिला टीमचा कोच कबीर खान (Kabir Khan) अर्थात शाहरुख खान यांच्यात ट्विटरवर संवाद रंगला.  हॉकी टीमच्या खऱ्या कोचनं पडद्यावरच्या कोचला भन्नाट उत्तर देत नेटीझन्सची मनं जिंकली आहेत. शोर्ड मारीने यांनी भारताच्या विजयानंतर महिला टीमच्या फोटोसह एक ट्विट केले होते. त्यामध्ये त्यांनी आपण घरी उशीरा येणार असल्याचं कुटुंबीयांना कळवले होते. ते ट्विट रीट्विट करत शाहरुख खाननं प्रतिक्रिया दिली आहे. "होय, काहीही हरकत नाही. फक्त परत येताना तुमच्या अब्जावधी कुटुंबीयांसाठी सोने घेऊन या. यावेळी धनत्रयोदशी देखील 2 नोव्हेंबर (शाहरुख खानचा वाढदिवस) आहे - माजी प्रशिक्षक कबीर खान' असं ट्विट शाहरुखनं केलं. त्यानंतर शोर्ड मरीने यांनी भन्नाट उत्तर दिलं आहे. "तुमचे प्रेम आणि पाठिंब्यासाठी आभार. आम्ही पुन्हा एकदा आमचे सर्वस्व पणाला लावू - खरा प्रशिक्षक' असं उत्तर त्यांनी दिलं असून हे उत्तर आता व्हायरल झालं आहे. कोण आहेत मरीने? शोर्ड मरीने हे हॉलंडचे असून त्यांना 10 वर्ष हॉकी खेळण्याचा अनुभव आहे. त्यांनी 2018 साली महिला हॉकी टीमच्या प्रशिक्षकपदाची सूत्रं हाती घेतली. भारतीय महिला टीम 36 वर्षांनी ऑलिम्पिकसाठी पात्र झाली होती. त्यामुळे टोकयो ऑलिम्पिकमध्ये टीम चांगली कामगिरी करेल ही मुख्य जबाबदारी मरीने यांच्या खांद्यावर होती. 'ये चांद सा रोशन चेहरा', विराट-अनुष्काच्या डान्सचा नवा VIDEO तुम्ही पाहिला का? भारतीय महिला टीममध्ये गुणवत्तेला कमी नाही. या गुणवत्तेला योग्य तंत्राची जोड मरीने यांनी दिली. त्यांनी खेळाडूंच्या फिटनेसवर भर दिला. ऑस्ट्रेलिया आणि युरोपीयन टीमच्या फिटनेसपुढे भारतीय खेळाडूंचा निभाव लागत नाही. त्याचा फटका मॅचमध्ये बसतो. हे लक्षात घेऊन त्यांनी खेळाडूंच्या फिटनेसवर भर दिला. त्याचा परिणाम या ऑलिम्पिकमध्ये दिसतो आहे.
  Published by:News18 Desk
  First published: