मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

तुझा अभिमान आहे मीराबाई! 'त्या' उपकारांची केली अशी परतफेड, सिल्व्हर गर्लने ठेवली मदतीची जाणीव

तुझा अभिमान आहे मीराबाई! 'त्या' उपकारांची केली अशी परतफेड, सिल्व्हर गर्लने ठेवली मदतीची जाणीव

टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics)  भारताला पहिले मेडल मीराबाई चानूनं (Mirabai Chanu) मिळवून दिले. ऑलिम्पिक मेडल जिंकून घरी परतल्यानंतर तिला सर्वात प्रथम अडचणीच्या काळात मदत करणाऱ्या व्यक्तींची आठवण झाली.

  • Published by:  News18 Desk

टोकयो, 7 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics)  भारताला पहिले मेडल मीराबाई चानूनं (Mirabai Chanu) मिळवून दिले. मीराबाईनं 49 किलो वजनी गटात एकूण 202 किलो वजन उचलत हे मेडल जिंकले. मीराबाईनं स्नॅच गटात 87 आणि क्लीन अँड जर्क गटात 115 किलो वजन उचललं. ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारी (Mirabai Chanu wins Silver Medal) ती पहिली भारतीय वेटलिफ्टर आहे.

मीराबाईच्या या ऐतिहासिक यशाबद्दल तिचे देशभर कौतुक होत आहे. ज्या ऑलिम्पिक मेडलचा ध्यास घेऊन तिने आजवर कष्ट केले, ते लक्ष्य अखेर पूर्ण झालं आहे. यशाच्या शिखरावर असतानाही मीराबाई तिच्या संघर्षाचा काळ विसरलेली नाही. ऑलिम्पिक मेडल जिंकून घरी परतल्यानंतर तिला सर्वात प्रथम अडचणीच्या काळात मदत करणाऱ्या व्यक्तींची  आठवण झाली.

मीराबाईचे गाव ते इफांळमधील तिचे ट्रेनिंग अकादामी यामध्ये 25 किलोमीटर अंतर होते. तिच्या घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे स्वतंत्र वाहन घेऊन हा प्रवास करणे तिला शक्य नव्हते. त्यावेळी राष्ट्रीय महामार्गावरील अनेक ट्रक ड्रायव्हर्सनी तिला मदत केली. ते मीराबाईला फुकट इंफाळपर्यंत नेत असत. त्यांनी केलेल्या मदतीमुळेच मीराबाईला वेटलिफ्टिंगचे ट्रेनिंग घेणे शक्य झाले आणि पुढे तिनं इतिहास घडवला.

ऑलिम्पिक मेडल जिंकल्यानंतर घरी परतलेल्या मीराबाईनं सुमारे 150 ट्रक ड्रायव्हर्स आणि हेल्परना घरी बोलावलं. त्यांचा टी शर्ट, मणिपूरी शाल  देऊन सत्कार केला. तसंच त्यांना आग्रहानं जेवायला दिलं. या प्रसंगी ती चांगलीच भावुक झाली होती.

IND vs ENG : चौथ्या दिवशी क्रिकेटचा की पावसाचा खेळ? वाचा कसे आहे शनिवारचे हवामान

ऑलिम्पिकच्या इतिहासात वेटलिफ्टिंगमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारी मीराबाई ही पहिली भारतीय आहे. रिओ ऑलिम्पिकमधील अपयश, दुखापत, वाढती स्पर्धा या सर्व आव्हानांचा सामना करत तिनं हा इतिहास घडवला. त्यामुळे ती सध्या अगदी टॉपवर आहे. यशाचे नवे मजले चढल्यानंतरही आपले पाय आजही जमिनीवर आहे. हे यशाचे मजले बांधण्यासाठी मदत करणाऱ्या प्रत्येक हाताची आपल्याला जाणीव आहे, हे मीराबाईनं फक्त बोलून नाही, तर प्रत्यक्ष करुन दाखवलं आहे.

First published:

Tags: Olympics 2021